माजी पाकिस्तानी अष्टपैलू आसिफ अराफातने हल्लीच एक गंभीर स्पष्टीकरण दिले. अराफातने हिंदी चित्रपट अभिनेता आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानबद्दल सांगितले की, तो आपल्याला आयपीएलमध्ये खेळण्याची विनंती करण्यासाठी थेट लंडनला आला होता.
पाकिस्तानी खेळाडूंना २००८च्या हंगामात खेळण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २००९ला पाकिस्तानी खेळाडूंवर बहिष्कार टाकण्यात आला. परंतु, २०१० साली पुन्हा पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली. पण एकाही संघांनी किंवा त्यांचा मालकांनी त्यांना घेण्याची इच्छा दाखवली नाही.
स्पोर्ट्स यारीसोबत बोलताना अराफात म्हणाला, “आयपीएलच्या पहिल्या हंगामापुर्वी कोलकाता संघाचा एक व्यक्ती माझ्याकडे ३ वर्षे आईपीएल खेळण्याचा करार घेऊन आला होता. त्यानंतर शाहरुखने स्वतः फोन करून मला कळविले. या सर्व गोष्टीनंतर शाहरुख स्वतः लंडनला आला होता.”
अराफतने सागितले की, “२००८चा हंगाम मला खेळता आला नाही. दुसऱ्या सत्रासाठी कोलकाता संघाने एक स्काउट इंग्लंडला पाठवली होती. त्या स्काउटने मला सांगितले होते कि, शाहरुख खान तुझ्या खेळावर जवळून लक्ष ठेऊन आहे. सुरुवातीला मला वाटले कि ते स्काउट मस्करी करत आहे किंवा मी मजाक मस्तीचा शिकार बनलो आहे. तेव्हा त्यांनी मला त्यांचे कार्ड दिले. परंतु, मी कधीही त्यांना फोन केला नाही.”
पुढे अराफात सांगतो की, “काही दिवसांनी मला परत भारतातून फोन आला. तेव्हा मला जाणवले कि, हि काही मस्करी नाही ते स्काउट खरे होते. त्यांनी मला विचारले कि, का तुम्ही आमच्यासोबत अजून संपर्क साधला नाही? दुसऱ्या दिवशी शाहरुखने मला परत फोन केला आणि बोलला ‘बोर्ड पार आपका स्वागत हे’.”
अराफातने पाकिस्तान संघासाठी ३ कसोटी सामने खेळले होते. तसेच त्याने ११ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले होते. २००९ साली जिंकलेल्या टी-२० विश्वचषकाच पाकिस्तान संघाचा तो भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ओळखा पाहू! आज क्रिकेटविश्वाला वेड लावणारे स्टार भारतीय क्रिकेटपटू, बालपणी दिसत होते ‘असे’
‘आजारी वडिलांना घेऊन खूप भटकलो, परंतु डॉक्टरांनी दार उघडले नाही,’ कोहलीने सांगितली दु:खद आठवण