पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना क्रिकेटविश्वातील सर्वात रोमांचक सामना असतो. पाकिस्तान विरुद्ध भारत या सामन्याची उत्सुकताही दोन्ही देशांच्या चाहत्यांना असते. टी-20 क्रिकेटमध्ये 2007 साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषकामध्ये या दोन्ही संघांचा सामना झाला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातपर्यंतही त्यांनी मजल मारली होती. भारताचा मजाी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरून इतिहास रचला होता.
आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासिर अराफतने भारत-पाकिस्थान या दोन्ही संघांची मिळून सर्वकालिन टी२० प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात पाकिस्तानी अष्टपैलूने भारताच्या 5 खेळाडूंचा समावेश केला आहे.
यासिर अराफतने भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांना मिळून एक सर्वकालिन प्लेइंग इलेव्हन बनवली आहे. या संघाचे नेतृत्वपद त्याने भारताचा माजी कर्णधार आणि पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला दिले आहे. धोनीव्यतिरिक्त भारतीय खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान दिले आहे. तर पाकिस्तानच्या 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यात शाहिद आफ्रिदीचेही नाव आहे .
एशेजपेक्षा भारत पाकिस्थान सामन्याला चाहते पसंत करतात.
या संघात यासिर अराफतने फलंदाजीची सुरवात करण्यासाठी रोहित शर्मा व विराट कोहलीची निवड केली आहे. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा फलंदाज मोहमद हाफीजला जागा दिली आहे. चौथ्या क्रमांकावर भारताच्या सिक्सर सिंग युवराज सिंगला स्थान दिले आहे. पाचव्या स्थानावर पाकिस्तानच्या उमर अकमलची निवड केली आहे.
संघाचा कर्णधार व यष्टीरक्षक म्हणून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची निवड केली आहे. सातव्या स्थानावर शाहिद आफ्रिदीला ठेवण्यात आले आहे. तर गोलंदाजीत पाकिस्तानचा सोहेल तन्वीर, उमर गुल व भारताचा धुरंदर जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मुख्य फिरकीपटू म्हणून सईद अजमलला स्थान दिले गेले आहे.
भारत-पाकिस्तान सर्वकालिन टी-20 संघ
रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद हफीज, युवराज सिंह, उमर अकमल, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), शाहिद अफरीदी, सोहेल तन्वीर, उमर गुल, जसप्रीत बुमराह आणि सईद अजमल.
महत्वाच्या बातम्या
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी खेळाडूंसह प्रशिक्षकांना ‘ही’ गोष्ट करणे बंधनकारक, वाचा सविस्तर
अथियाच्या इंस्टाग्राम पोस्टने चर्चेला उधान; नेटकरी म्हणाले, ‘राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहेस?’
विराट नव्हे ‘हे’ फलंदाज कव्हर ड्राइव्हचे मास्टर, कर्णधार आझमने सांगितली नावे