न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्युझीलंडने पाकिस्तानचा 101 धावांनी पराभव केला आहे. न्युझीलंडने संपूर्ण सामन्यात पाकिस्तानवर दबाव बनवला होता. पाकिस्तानला जरी या सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले असले तरी, पाकिस्तानी फिरकीपटू यासिर शहाच्या एका कृतीने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत.
सामन्याच्या चौथ्या दिवशी यासिर शह सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी त्याने एका प्रेक्षकाला आपली कॅप भेट केली. यासिर कडून कॅप मिळाल्याने तो प्रेक्षक फारच आनंदी दिसला . त्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. यासिरच्या या कृतीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1344076053296283648
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, पाकिस्तानला येथे मात्र आपल्या खेळातून प्रेक्षकांचे मन जिंकता आले नाही. संपूर्ण सामन्यात न्युझीलंडने आपला दबदबा कायम ठेवला होता. यासिरच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने पहिल्या डावात ३ फलंदाजांना बाद केले होते. मात्र दुसर्या डावात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. पाकिस्तानला आपल्या या अनुभवी फिरकी गोलंदाजाकडून आगामी सामन्यात उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान
– पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिजवानचा मैदानावर अतरंगी डान्स, पाहा व्हिडिओ




