भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. भारताने या मालिकेतील सलग दुसरा सामना १० विकेट्सने जिंकला. संघातील सर्वांनी चांगले प्रदर्शन केल्यामुळे हा विजय एवढा सोपा बनू शकला. यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाचे सामन्यादरम्यान एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे अनुष्का संजीवनीला विकेट गमवावी लागली.
श्रीलंकन संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि संघ स्वस्तात गुंडाळला गेला. श्रीलंकन संघ फलंदाजी करत असताना २३ व्या षटकात अनुष्का संजीवनी (Anushka Sanjeewani) हिने अवघ्या २५ धावांवर विकेट गमावली. यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिच्या चपळाईमुळे अनुष्काला अनपेक्षीतपणे विकेट गमवावी लागली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फॅनकोडच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत यास्तिका खेळपट्टीवरील चेंडू उचलताना दिसत आहे. तिने हा चेंडू उचलून स्टंप्सवर मारला. फलंदाजी करणाऱ्या अनुष्काने असा विचार केला असावा की, यष्टीरक्षक खेळपट्टीवरील चेंडू उचलण्याचा प्रयत्न करणार नाही. याच कारणास्तव तिने वेळेत क्रिजच्या आत येण्याचा प्रयत्नही केला नाही. दीप्ती शर्माने टाकलेल्या चेंडूला डिफेंस केल्यानंतर तिने क्रिजच्या आत येण्याचा प्रयत्नही केला नाही. फलंदाज सावध नसताना यास्तिकाने मात्र संधी सांधली आणि संघाला विकेट मिळून दिली. पंचांनी बराच वेळ या विकेटची समीक्षा केली आणि शेवटी अनुष्काला बाद घोषित केले.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर श्रीलंकन संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १७३ धावांवर गुंडाळला गेला. या धावा करण्यासाठी त्यांच्या खेळाडूंनी ५० षटके खेळून काढली. श्रीलंकेसाठी अमा कांचनाने नाबाद ४७ धावा केल्या आणि ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडूही ठरली. श्रीलंकेची दुसरी एकही खेळाडू अपेक्षित धावा करू शकली नाही.
What separates good keepers from the best? Alertness! @YastikaBhatia showed sheer wit and presence of mind with this "stumping"!
Watch all the action from India Women's tour of Sri Lanka FOR FREE, LIVE on #FanCode 👉https://t.co/66xRNVrDpw@BCCIWomen@OfficialSLC#SLvIND pic.twitter.com/B7dTLKoEfA
— FanCode (@FanCode) July 4, 2022
भारतीय संघासाठी रेणुका सिंगने १० षटकांमध्ये २८ धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या ४ विकेट्स घेतल्या. तसेच मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा य़ांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा अवघ्या २५.४ षटकात त्यांनी विजय मिळवला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी १७४ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्म्रीती-शेफालीच्या झंझावाती खेळी, १७४ धावांच्या अभेद्य भागीदारीसह भारताला जिंकून दिली वनडे मालिका
‘बेन स्टोक्स स्वत:ची विकेट वाचवण्याचा प्रयत्नच करत नव्हता’, माजी क्रिकेटरने टोचले कान