---Advertisement---

WIPL। ‘मला मुंबई इंडियन्ससाठी खेळायला आवडेल’, टीम इंडियाच्या महिला खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

On: रविवार, जून 12, 2022 10:17 PM
Yastika-Bhatia
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने महिला आयपीएलविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महिला आयपीएल हा चर्चेचा विषय ठरला आहे. भाटियाने सांगितले की, जेव्हा कधी ही स्पर्धा खेळवली जाईल, तेव्हा तिला मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायला आवडेल.

भारतीय महिला संघाचा युवा फलंदाज यास्तिक भाटिया (Yastika Bhatia) हिने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पदार्पणापासून तिचे प्रदर्शन निरंतरपणे चांगले राहिले आहे. भाटियाने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात देखील सहभाग घेतला होता. विश्वचषकात मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय संघासाठी तिने उत्तम प्रदर्शन केले होते. तिने सांगितले की, ती पहिल्यापासूनच रोहित शर्मा कर्णधार असेलल्या मुंबई इंडियन्सची चाहती राहिली आहे.

महिला आयपीएल (Womens IPL) याविषयी बोलताना भाटिया म्हणाली की, “मला कोणत्याही संघाने निवडले, तरी काही अडचण नाही. मात्र, जर माझ्याकडे पर्याय असतील, तर मला मुंबई इंडियन्ससाठी खेळायला आवडेल. मी लहानपणापासून या संघाला फॉलो करत आले आहे आणि हा माझा आवडता संघ आहे.”

“मला लहानपणापासूनच यष्टीरक्षण आवडते. जसे मिताली (राज) दी म्हणाली की, मी खूप बोलते. मी क्रिकेटविषयी तासंतास बोलू शकते. त्यामुळे जेव्हा कधी मी यष्टीरक्षण करत असते, तेव्हा मी खेळाडूंंसोबत बोलत असते, जेणेकरून वातावरण चांगले राहील आणि यामध्ये मजा येते. वातावरण जेवढे सकारात्मक असेल, प्रदर्शनही तेवढेच चांगले असेल,” असेही पुढे बोलताना ती म्हणाली.

दरम्यान, मागच्या बऱ्याच वर्षांपासून महिला आयपीएल आयोजित करण्यासाठी खेळाडू आणि दिग्गज इच्छा व्यक्त करत आहेत. पण अद्याप तरी ही स्पर्धा आयोजित करता आलेली नाहीये. परंतु मागच्या काही वर्षांपासून बीसीसीआय महिला टी-२० चॅलेंज ही स्पर्धा नक्कीच आयोजित करत आहे. यामध्ये तीन संघ संग सहभाग घेतात. महिला आयपीएलच्या धरतीवर बीसीसीआयने या स्पर्धेला २०१८ मध्ये सुरुवात केली होती. महिला क्रिकेटची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भविष्यात लवकरच पुरुषांच्याप्रमाणे महिला आयपीएल आयोजित केली जाऊ शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताच्या माजी दिग्गजाला भेटण्यासाठी ‘द वॉल’ने काढला वेळ, Photo Viral

कमाईच्या बाबतीत आयपीएल देतंय थेट इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर, खुद्द दादांनीच केले स्पष्ट

धोनीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची डी कॉकची सुवर्णसंधी हुकली, दुसऱ्या टी२०मधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---