यंदाचे 2024 हे वर्ष संपणार आहे. हा वर्ष निवृत्तीचा राहिला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण भारतीय खेळाडूंसह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. ज्यामध्ये शिखर धवन, दिनेश कार्तिक विराट कोहली रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूंसह विदेशी डेव्हिड वाॅर्नर, जेम्स अँडरसन तसेच फूटबाॅलपटू सुनिल छेत्री, भारतीय हाॅकी संघाचा वाॅल श्रीजेश अश्या अनेक दिग्गजांनी आपल्या क्षेत्राला रामराम ठोकले. तसेच यामध्ये टेनिसपटू राफेल नदालचाही समावेश आहे.
रोहित-कोहली आणि जडेजाने टी20 निवृत्ती घेतली
2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटला अलविदा केला. तथापि, हे तिन्ही खेळाडू इतर दोन फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. म्हणजे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट. इतर दोन फॉरमॅटमधील यापैकी काही खेळाडू पुढील वर्षी निवृत्ती जाहीर करू शकतात. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धवन-कार्तिकनेही निरोप घेतला
क्रिकेटविश्वात गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेले शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांनीही यावर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघांनीही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धवन शेवटची कसोटी 2018 मध्ये, 2021 मध्ये टी20 आणि 2022 मध्ये वनडे सामना खेळला होता. तर कार्तिक शेवटची कसोटी 2018, वनडे 2019 आणि टी20 सामना 2022 मध्ये खेळला होता.
जेम्स अँडरसनने लाॅड्सवर शेवटचा सामना खेळला
इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने देखील या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. क्रिकेटचा ‘मक्का’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर 10 ते 14 जुलै दरम्यान खेळवललेली कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरली. 41 वर्षीय जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडसाठी 187 कसोटी सामन्यांत 700 बळी घेतले आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा महाकाय टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे.
डेव्हिड वॉर्नरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
यंदाच्या टी20 विश्वचषकातून बांग्लादेश आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडली. यानंतर दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे सांगितले होते. मात्र यंदाच्या मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला. डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये आपल्या टी20 आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरुवात केली होती. तर 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
सुनिल छेत्रीनेही यावर्षी खेळला आखेरचा सामना
भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने यावर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 6 जून रोजी कुवेतविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. 39 वर्षीय छेत्रीने 2005 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. छेत्रीने मार्चमध्ये गुवाहाटी येथे अफगाणिस्तानविरुद्ध भारतासाठी 150 वा सामना खेळला. त्या सामन्यात त्याने एक गोलही केला होता. तो सामना भारताने 1-2 ने गमावला.
राफेल नदालची निवृत्ती
या वर्षीत स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालनेही निवृत्ती जाहीर केली. त्याने 10 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. राफेल नदालने आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन आणि 4 अमेरिकन ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. त्याने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरीत सुवर्णपदक आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. इतकंच नाही तर तो 2004, 2009, 2021 आणि 2019 मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही सदस्य होता.
अश्विननेही टाटा बाय बाय केले
गाबा कसोटीनंतर आर अश्विननेही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 च्या पराभवाने अश्विन खूप दुखावला. प्लेइंग इलेव्हनच्या हमीशिवाय त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याला स्थान मिळाले नाही, तेव्हा अश्विनला निवृत्तीची घोषणा करायची होती. परंतु रोहित शर्माने त्याला ॲडलेड कसोटीपर्यंत थांबवले जेथे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. तिसऱ्या कसोटीत त्याला पुन्हा वगळण्यात आले. तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केली. अश्विनने 2022 मध्ये शेवटचा टी20 आणि 2023 मध्ये एकदिवसीय सामना खेळला होता.
2024 मध्ये निवृत्त होणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी
सौरभ तिवारीने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
वरुण आरोनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
दिनेश कार्तिकने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
केदार जाधवने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
विराट कोहलीने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
रोहित शर्माने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
रवींद्र जडेजाने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
शिखर धवनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
बरिंदर सरन यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
वृद्धीमान साहाने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
सिद्धार्थ कौलने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
आर अश्विनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
हेही वाचा-
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई अपयशी, प्रतिस्पर्धी संघाने 383 धावांचे आव्हान गाठले
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, सरावसत्रात केएल राहुल दुखापती
13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक