Year Ender 2024: भारतीय क्रीडा जगतासाठी 2024 हे वर्ष खूप चांगले राहिले. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडीज आणि यूएसएने संयुक्तपणे आयोजित केलेला टी20 विश्वचषक जिंकला, तर चेसमध्ये डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंची चमक दिसली ज्यामध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले तर मनू भाकरने नेमबाजीत 2 पदके जिंकली. तथापि, वर्षभरात असे काही वाद दिसले, जे खूप चर्चेचे विषय ठरले. ज्यामध्ये विनेश फोगटच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटची अपात्रतेचा मुद्दा खूप चर्चेत राहिला.
यंदाचा पॅरिस ऑलिम्पिक मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय राहिला. त्यामुळे हे ऑलिम्पिक वादांच्या भोवऱ्यात सापडले. ज्यात भारतीय कॅम्पसाठी देखील वाईट बातमी होती. कारण विनेश फोगट कुस्तीत महिलांच्या 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडली. ज्यामागचे कारण धक्कादायक होते, केवळ 100 ग्रॅम अतिवजन असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.
वास्तविक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी केवळ 100 ग्रॅमने जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. या निर्णयानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. मात्र, फायनलच्या दिवशी सकाळी फक्त 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला नियमानुसार अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरुद्ध तिने क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) अपील केले, परंतु त्यांचा निर्णयही फोगटच्या विरोधात आला. ज्यामुळे तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्णपणे भंग पावले. या निर्णयानंतर फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होते. ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6 पदके आली. ज्यात टीम इंडियाने 6 पैकी 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, यावेळी भारताच्या खात्यात एकही सुवर्ण आले नाही. यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती, जी भारताची एका ऑलिम्पिकमधील सर्वोच्च संख्या होती.
हेही वाचा-
कोहलीसोबतच्या बाचाबाचीवर सॅम कॉन्स्टासची प्रतिक्रिया, म्हणाला, “कोहलीनं जाणूनबुजून…”
‘अरे जैस्सू…’, क्षेत्ररक्षणा दरम्यान रोहित शर्मा जयस्वालला झापला, पाहा VIDEO
कॉन्स्टासला धक्का मारणं विराटला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई