न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात विश्वचषकातील दहावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाला हे आव्हान पेलले नाही. त्यांना या स्पर्धेतील पहिला पराभव पाहावा लागला. या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) आपल्यावर दडपण आले होते, अशी कबुली दिली.
स्मृतीने ठोकले शानदार शतक
या स्पर्धेमध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने लाजवाब शतक साजरे केले. तिने ११९ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या. तसेच हरमनप्रीतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १० चौकारांच्या साहाय्याने १०९ धावांची तुफानी खेळी केली.
सामन्यानंतर बोलताना स्मृती म्हणाली,
“खरेतर ९० धावा पार केल्यानंतर मी काहीशी नर्व्हस झाले होते. त्याच वेळी मला एक जीवदानही मिळाले. यानंतर मी शतक पूर्ण केले. संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद वाटत आहे.”
स्मृती हिला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. मात्र, तिने दुसरी शतकवीर हरमनप्रीत कौर हिच्यासोबत पुरस्कार शेअर केला. या कृतीसाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡!👏 👏
Hundreds from @mandhana_smriti & @ImHarmanpreet 👍 👍
Impressive performance with the ball 👌 👌
The @M_Raj03-led #TeamIndia complete a clinical 1⃣5⃣5⃣-run victory over the West Indies. 🙌 🙌 #CWC22 | #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/ZOIa3KL56d pic.twitter.com/XG2jJTdV5P
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
भारतीय संघ पहिल्या स्थानी
विश्वचषकातील आपला तिसरा सामना खेळत असलेल्या भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना व हरमनप्रीत कौर यांच्या शतकांच्या जोरावर ३१७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १६२ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघासाठी स्नेह राणाने सर्वाधिक ३ बळी मिळवले. वेस्ट इंडीजवरील या १५५ धावांच्या दणदणीत विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)