आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात गुजरातने शुबमन गिल याच्या शतकाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. त्यासह आरसीबीचे आयपीएल पटकावण्याचे स्वप्न आणखी एक वर्ष पुढे गेले.
गुजरात विरुद्धच्या सामन्यात केवळ विजयच आरसीबीला प्ले ऑफमध्ये घेऊन जाणार होता. विराट कोहली याने आपला दमदार फॉर्म कायम राखत, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. विजयासाठी मिळालेले 198 धावांचे आव्हान गिलने नाबाद शतक पूर्ण करत अगदी सहजतेने गाठून दिले. त्यामुळे आरसीबीच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
या संपूर्ण हंगामात आरसीबीच्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी उत्कृष्ट राहीली. कर्णधार फाफ डू प्लेसिस 14 सामन्यांमध्ये 730 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी राहिला. विराटनेदेखील कमालीचे सातत्य दाखवतात 14 सामन्यांमध्ये 639 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. संघाचा तिसरा सर्वात अनुभवी खेळाडू असलेला ग्लेन मॅक्सवेल याने देखील वेळोवेळी संघाला सावरले. वेगाने धावा करताना त्याचा स्ट्राइक रेट स्पर्धेतील दुसरा सर्वोच्च (183) ठरला. त्यासोबतच गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज हा पावर प्ले मध्ये नेहमी संघाला बळी मिळवून देण्यात यशस्वी ठरला. पावर प्ले मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 5.13 असा दमदार होता. मात्र, तरीदेखील संघाला प्ले ऑफसाठी पात्र होत आहे नाही.
वरिष्ठ खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख पार पाडली असली तरी, युवा खेळाडूंकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही. मागील हंगामात फिनिशरची भूमिका बजावलेल्या दिनेश कार्तिकला यावेळी पूर्णतः अपयश आले. गोलंदाजी विभागात हसरंगा, वैशाक विजयकुमार व वेन पार्नेल हे सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाहीत. तर युवा अनुज रावत, महिपाल लोमरोर व सुरेश प्रभूदेसाई यांनी सपशेल निराशा केली.
(Yet Another Year RCB Not Win IPL Trophy Plesis Virat Siraj Individual Brillance Not Enough)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिरो हिटमॅन! धुवांधार अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, पुढे फक्त विराटच