---Advertisement---

यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी बाकी देशांपेक्षा भारतात लागतात सर्वात कमी गुण

On: गुरूवार, जून 21, 2018 7:21 PM
---Advertisement---

मागील काही महिन्यांपासुन यो-यो टेस्टची खूप चर्चा झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही फिटनेस टेस्ट पार करणे बीसीसीआयने सक्तीचे केले आहे.

या टेस्टमध्ये अयशस्वी झाल्याने युवराज सिंग, सुरेश रैना, मोहम्मद शमी, अमित मिश्रा,अंबाती रायडू अशा अनेक खेळाडूंना भारतीय संघातील स्थान गमवावे लागले होते.

त्यामुळे या टेस्टच्या आधारावर खेळाडूंना संघात स्थान दिले जावे की नाही किंवा बीसीसीआयचा हा निर्णय कठोर आहे की नाही, अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली.

भारतीय खेळाडूंना ही यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी 16.1 गुण मिळवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ही 16.1 गुणांची पातळी बाकी देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान या संघाच्या यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी भारतापेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर मुंबई मिररशी बोलताना म्हणाले, ‘ आम्ही यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी 17.4 ठेवली आहे.’

तसेच इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये यो-यो टेस्ट गुणांची पातळी 19 आहे. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये 18.5, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये ही गुणांची पातळी 17.4 एवढी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

गांगुली म्हणतो; या गोलंदाजाने अनिल कुंबळेच्या संपर्कात रहायला हवे!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment