---Advertisement---

‘विराटने विश्वचषक जिंकावा, अशी धोनीची इच्छा नव्हती’, कॅप्टन कुलवर माजी दिग्गजाचा गंभीर आरोप

MS Dhoni
---Advertisement---

एमएस धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण धोनीशी संबंधित अनेक वाद आणि चर्चा मागच्या काही वर्षांमध्ये मसोर आल्या आहेत. युवराज सिंग आणि एमएस धोनी अनेक वर्ष देशासाठी एकत्र खेळले आहेत, पण अष्टपैलू खेळाडूचे वडील नेहमीच धोनीवर टीका करत आले आहेत. यावेळी युवराजच्या वडिलांना धोनीवर खूपच मोठा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धोनी 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताला हरवण्यासाठी खेळला.

युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्यावर त्यांनी यापूर्वीही अनेकदा टीका केली आहे. पण यावेळी धोनी आपल्या संघाला पराभूत व्हावा यासाठी संथगतीने खेळत होता, असा थेट आरोपच त्यांनी त्याच्यावर केला आहे. 2019 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता, आणि संघ विजेतेपदासाठी प्रवळ दावेदार मानला जात होता. पण विराटला विश्वचषक जिंकता येऊ नये, यासाठी धोनी उपांत्य सामन्यात आपल्या क्षणतेप्रमाणे खेळला नाही आणि संघाला पराभूत केले, असा आपोर योगराज सिंग यांनी त्याच्यावर लावला.

माध्यमांशी बोलताना योगराज सिंग म्हणाले की, “रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) एका बाजूने जबरदस्त साहस दाखवत होता आणि भारताला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा होता. तर दुसरीकडे धोनी मात्र, आपल्या क्षमतेप्रमाणे खेळत नव्हता. जर धोनी आपल्या क्षमतेच्या 40 टक्के जरी खेळला असता, तरीही आपण 48 व्या षटकात जिंकलो असतो.”

“जडेजा त्याच गोलंदाजाला आणि त्याच खेळपट्टीवर चौकार षटकार मारत होता. पण धोनी मात्र, तू मार… पंड्यालाही म्हणत होता तू मार… त्याने दोन फलंदाजांना बाद केले. जर जडेजा अशा प्रकारची खेळी करू शकत होता, तर धोनीही खेळू शकत होता आणि भारतीय संघ 48 षटकात जिंकला असता. पण दुसरीकडे सीएसकेसाठी खेळताना धोनी 15 चेंडूत 40 धावा, 20 चेंडूत 50 धावा करतो. यादरम्यान जबरदस्त चौकार आणि षटकारही मारतो,” असे योगराज सिंग म्हणाले.

दरम्यान, भारतीय संघ 2019 विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात उपांत्य सामन्यापर्यंत गेला होता. मात्र, उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 239 धावांचे लक्ष्य गाठताना संपूर्ण भारतीय संघ 221 धावांवर गुंडाळला गेला. (Yogiraj Singh’s serious allegations against MS Dhoni)

महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । वेस्ट इंडीजविरुद्ध जडेजा मोडणार सर्व विक्रम! कुंबळे आणि कपिल निशाण्यावर
KL Rahul । चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सलामीवीर फलंदाज लवकरच करणार पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---