भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. नुकताच 7 जुलै रोजी धोनीने 42वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यावर जगभरातील चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यानेही धोनीच्या वाढदिवशी खुलासा केला की, धोनी माझ्या पत्नीला म्हणायचा की, मला 30 लाख रुपये कमवायचे आहेत. चला तर, या किस्स्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
वसीम जाफर (Wasim Jaffer) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मी 2005मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्यावेळी धोनी संघात नवीन होता. आम्ही सर्वजण अधिकतर मागच्या ओळीत बसायचो. माझी पत्नी, धोनी, दिनेश कार्तिक, मी आणि आरपी सिंग सर्वजण एकसोबत मागच्या खुर्च्यांवर बसायचो. माझ्या पत्नीशी धोनी खूप बोलायचा. तो नेहमी म्हणायचा की, वहिनी मला 30 लाख रुपये कमवायचे आहेत.”
एमएस धोनी (MS Dhoni) म्हणायचा की, तो 30 लाख रुपये कमावून आरामात आपले आयुष्य घालवू इच्छितो. त्याला रांचीत घर घ्यायचे होते. त्याला इतर कोणत्याही शहरात जाण्याची इच्छा नव्हती. तो म्हणायचा की, “काहीही झाले तरीही मी रांची कधीच सोडणार नाही.”
जाफरने सांगितले की, “धोनी संघात नवीन होता, त्यामुळे त्याला वाटायचे की, 30 लाख रुपये आयुष्य घालवण्यासाठी पुरेसे असतील. त्यामुळे तो असे म्हणायचा. धोनी आपल्या मातीशी जोडलेला आहे. आजही तो इतका यशस्वी झाला आहे, पण तरीही तो आपल्या शहराशी जोडला आहे. मला धोनीबाबत एक गोष्ट खूप आवडायची की, तो गोष्टी सहजरीत्या सर्वांपुढे मांडायचा.”
आज आहे 1040 कोटी रुपयांचा मालक
विशेष म्हणजे, 2004 ते 2019 अशा 15 वर्षांच्या कारकीर्दीत धोनीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यासोबतच त्याने प्रचंड पैसाही कमावला. सध्याच्या घडीला तो भारतातील तिसरा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, धोनीकडे 1040 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वसीम जाफर याची कारकीर्द
वसीम जाफर याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 31 कसोटी सामने आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 34.10च्या सरासरीने 1944 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 5 शतके, 2 द्विशतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, वनडेत त्याने फक्त 10 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याची प्रथम श्रेणी कारकीर्द खूपच जबरदस्त राहिली आहे. त्याने 260 सामन्यांतील 421 डावात फलंदाजी करताना 50.67च्या सरासरीने 19410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तब्बल 57 शतकांचा आणि 91 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये त्याने 8 सामन्यात फलंदाजी करताना 1 अर्धशतकासह 130 धावा केल्या आहेत. (former cricketer ms dhoni told wasim jaffer wife bhabhi i want to earn only 30 lakh rupees to spend time in ranchi know here)
महत्वाच्या बातम्या-
ऍशेस मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला सचिनचा मोलाचा सल्ला! वाचा काय म्हणाला मास्टर ब्लास्टर
रिषभ पंतचे ग्राउंडवर कमबॅक! खास सामन्यासाठी हार्दिक पंड्यासोबत लावली हजेरी