---Advertisement---

योगराज सिंगंच्या शब्दांमध्ये मोठा बदल! धोनीसाठी प्रेमाचा वर्षाव, तर रोहित-विराटबद्दलही मोठ वक्तव्य

On: गुरूवार, मार्च 27, 2025 6:21 PM
---Advertisement---

युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी एकेकाळी मोकळेपणाने धोनीवर टीका केल्या आहेत. पण आता झालेल्या एका इंटरव्यू मध्ये त्यांचा वक्तव्य बदललेल दिसून आलं. त्यांनी सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भविष्याबाबत कपिल देव यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी हे देखील म्हटलं आहे की, आयपीएल मधील संघ पंजाब किंग्स संघाला ते प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहेत. जर त्यांना मध्येच कुणी अडवलं नाही तर पुढचे चांगले निर्णय दिसू शकतात.

योगराज सिंग यांनी तरुवर कोहली सोबत इंटरव्यू मध्ये म्हटले की, ते अर्जुन तेंडुलकरला 6 महिन्यांच्या आत जगातील सर्वात श्रेष्ठ फलंदाज बनवू शकतात. त्यांना विचारण्यात आले की, जर तुम्ही टीम इंडियाचे प्रशिक्षक असता तर त्यामध्ये काय बदल केला असता? यावर ते म्हणाले की मी, अशी इंडियन क्रिकेट टीम बनवेन जो संघ कधीच हरणार नाही.

योगराज सिंग यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विषयी म्हटले की, जर ते चांगलं खेळत नसतील तर तुम्ही म्हणता त्यांना काढून टाका, पण का? ते चुकीच्या परिस्थितीतून जात आहेत तेव्हा त्यांची मदत करा. मी म्हणतो कि रणजी खेळूया, सराव करूया. रोहित चल 20 किलोमीटर पळून आणि सराव करू. कोणीही या प्रकारे असं करण्यासाठी तयार नाही.

याच इंटरव्यू दरम्यान योगराज सिंग यांनी धोनी विषयी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, तो रोहित शर्मा आणि विराट कोहली असा नाही, ज्याला तुम्ही काढून टाकता. तो असा आहे ज्यांची तुम्ही काळजी करता. मी त्याला आपलेपणाने मानतो. मी त्याच्यामध्ये आणि युवराज मध्ये भेदभाव करत नाही. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे मानतो, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे.

माजी भारताचे कर्णधार कपिल देव यांच्या बद्दलही वेगळंच वक्तव्य केलं ते म्हणाले की, ते कपिल देव यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांनी जे काही चुकीचे केलं फक्त ते मानूया. जेव्हा मला समजलं की, त्यांना हार्ट अटॅक आला आहे तेव्हा मी दिल्लीमध्ये आलो आणि मला वाईट वाटलं. मी रडलो देखील, माझ्या पत्नी आणि मुलांनी विचारले की मी कुणासाठी इतकं रडत आहे मी म्हटलं, माझ्या मित्रासाठी. तो असा नाही मरू शकत, मी त्यांना पूर्ण रात्री फोन केले त्यानंतर मला कळाले की तो आता व्यवस्थित आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---