पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात रुमा गायकैवारी, सायना देशपांडे यांनी तर, मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, यशराज दळवी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला.
एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत रुमा गाईकैवारीने सोनल पाटीलचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 0-6, 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित सायना देशपांडेने दुसऱ्या मानांकित लोलाक्षी कांकरियाचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रुमा गाईकैवारीचा सामना सायना देशपांडेशी होणार आहे.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवाल याने पाचव्या मानांकित प्रसाद इंगळेचा 3-6, 6-4, 6-4असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित यशराज दळवीने मानस धामणेवर 6-3, 6-1असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात सिया देशमुख व रुमा गाईकैवारी यांनी ख़ुशी शर्मा व ख़ुशी किंगर या जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(7-2), 7-6(7-3)असा पराभव केला. सोनल पाटील व परी चव्हाण या जोडीने आस्था खरे व अग्रिमा तिवारीवर 6-0, 6-4असा विजय मिळवला. लोलाक्षी कांकरियाने समीक्षा श्रॉफच्या साथीत मयुखी सेनगुप्ता व गौतमी खैरे यांचा 7-5, 6-4असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुली:
रुमा गाईकैवारी वि.वि.सोनल पाटील 7-6(5), 0-6, 6-3;
सायना देशपांडे(5)वि.वि.लोलाक्षी कांकरिया(2)6-3, 6-4
16वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल(3)वि.वि.प्रसाद इंगळे(5)3-6, 6-4, 6-4;
यशराज दळवी(2) वि.वि.मानस धामणे 6-3, 6-1;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली:
सिया देशमुख/रुमा गाईकैवारी वि.वि.ख़ुशी शर्मा/ख़ुशी किंगर(1) 7-6(7-2), 7-6(7-3);
सोनल पाटील/परी चव्हाण(4)वि.वि.आस्था खरे/अग्रिमा तिवारी 6-0, 6-4;
लोलाक्षी कांकरिया/समीक्षा श्रॉफ(3)वि.वि.मयुखी सेनगुप्ता/गौतमी खैरे 7-5, 6-4;
मधुरीमा सावंत/अन्या जेकब(2)वि.वि.स्वरा काटकर/संचिता नगरकर 6-1, 6-3;
मुली:
दक्ष अगरवाल/अनर्घ गांगुली(1)वि.वि.अभिरव पाटणकर/ईशान जिगली 7-5, 6-1;
सोहम भरमगोंडे/प्रणव गाडगीळ(4)वि.वि.कुशल चौधरी/अर्णव ओरुगांती 2-6, 6-3, 10-8;
प्रसाद इंगळे/अथर्व आमरुळे(2)वि.वि.अननमय उपाध्याय/आर्यन हूड 6-1, 6-2;
इंद्रजीत बोराडे/रोहन फुले वि.वि.मानस धामणे/अंशूल सातव 7-6(7-4), 4-6, 10-5.