पुणे, 14 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य पाटील, विहान मुर्ती, जतीन सराफ, दियान पारेख, शर्वरी सुरवसे, सान्वी पाटील या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत जतीन सराफने शान ठाकरचा 15-3, 15-3 असा तर, दियान पारेखने कियाांश शर्माचा 15-9, 15-12 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत अतिक्ष अग्रवाल याने शनयू गुप्तावर 15-9,13-15, 15-8 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
13 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत रुद्रनिराजे निंबाळकरने कडवी झुंज देत प्रेरणा खाडेचा 15-4, 13-15, 15-8 असा पराभव केला. श्रावणी आर्डेने ऋषिका रसाळचा 15-2, 15-5 असा तर, शर्वरी सुरवसेने समन्वया धनंजयचा 15-8, 15-6 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सान्वी पाटील हिने नाविका जैनला 15-13, 15-7 असे पराभुत केले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत चैतन्य परांडेकरने वरद लांडगेला 15-7, 15-7असे नमविले.आदित्य पाटीलने पार्थ झलावडियाचा 15-8, 15-9 असा तर, विहान मूर्तीने ओम दरेकरचा 15-5, 15-7 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
जतीन सराफ वि.वि.शान ठाकर 15-3, 15-3;
दियान पारेख वि.वि.कियाांश शर्मा 15-9, 15-12;
खुश दिक्षित वि.वि.यशस मोर 15-6, 15-5;
अतिक्ष अग्रवाल वि.वि.शनयू गुप्ता 15-9,13-15, 15-8;
11 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
कायरा रैना वि.वि.अग्रिमा राणा 15-4, 14-16, 15-2
धनी झलावडिया वि.वि.अस्मी सपकाळ 15-8,15-9;
गार्गी कामठेकर वि.वि.आदित्री चौधरी 15-5, 15-3;
दिविशा सिंग वि.वि.आदया गाडगीळ 15-10, 15-11
13 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
समीहान देशपांडे वि.वि.अन्वय समग 15-9, 15-5;
सौरिश काणे वि.वि.रिशान हंसदा 15-8,11-15, 15-10;
रेयाश चौधरी वि.वि.मीर शाहजार अली 15-13, 15-6;
अनय एकबोटे वि.वि.जतीन सराफ 15-8, 15-12;
13 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
श्रावणी आर्डे वि.वि.ऋषिका रसाळ 15-2, 15-5
शर्वरी सुरवसे वि.वि.समन्वया धनंजय 15-8, 15-6
रुद्रानीराजे निंबाळकर वि.वि.प्रेरणा खाडे 15-4, 13-15, 15-8
सान्वी पाटील वि.वि.नाविका जैन 15-13, 15-7
15 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
सलील मणेरी वि.वि.समीहन देशपांडे 15-4, 15-8
विहान मूर्ती वि.वि.ओम दरेकर 15-12, 15-9
ईशान लागू वि.वि.अवनीश बांगर 15-7, 15-11;
वरद लांडगे वि.वि.आयुष पाटील 15-7, 11-15, 15-13;
15 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
संस्कृती जोशी वि.वि.रुद्रनिराजे निंबाळकर 15-11, 15-8;
सफा शेख वि.वि.प्राजक्ता गायकवाड 15-13, 15-9;
आयुशी काळे वि.वि.पीयूशा फडके 12-15, 15-11, 15-11;
17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
चैतन्य परांडेकर वि.वि.वरद लांडगे 15-7, 15-7;
आदित्य पाटील वि.वि.पार्थ झलावडिया 15-8, 15-9;
विहान मूर्ती वि.वि.ओम दरेकर 15-5, 15-7;
19 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
वात्सल्य गर्ग वि.वि.हर्ष पाटील 13-15, 15-8, 15-13;
दिव्यांश सिंग वि.वि.मिहिर गोखरू 15-7, 15-8;
आयुष कमल वि.वि. ऋग्वेद भोसले 15-12, 15-6;
दुहेरी गट:
13 वर्षाखालील मुली: राऊंड रॉबिन तिसरी फेरी:
रुद्रानीराजे निंबाळकर/तेजस्वी भुतडा वि.वि.नाविका जैन/श्रावणी आर्डे 16-14,13-15,15-6;
मुद्रा मोहिते/प्रेरणा खाडे वि.वि.मनवा महाजन/मिहिका पाठक 15-6, 16-14;
15 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
आर्या कुलकर्णी/मधुरा काकडे वि.वि.अनन्या देशपांडे/निनोष्का देवडिकर 15-5, 15-2;
आयुशी काळे/आयुशी मुंडे वि.वि.रिधिमा जोशी/शर्वरी सुरवसे 15-6, 16-14;
15 वर्षाखालील मिश्र गट: राऊंड रॉबिन दुसरी फेरी:
ईशान लागु/आयुशी काळे वि.वि.सौरिश काणे/शर्वरी सुरवसे 15-9, 15-8;
अजिंक्य जोशी/संस्कृती जोशी वि.वि.अमोघ काळे/अनन्या देशपांडे 15-11, 15-10.
महत्वाच्या बातम्या –
प्रतीक्षा संपली! दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात डेवाल्ड ब्रेविसची निवड, बलाढ्य देशाविरुद्ध खेळणार मायदेशातील मालिका
कोच राहुल द्रविडचे दिलासादायक वक्तव्य, राहुल आणि श्रेयसच्या कमबॅकचे दिले संकेत