श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून बराच काळ एकत्र खेळले आहेत. तसेच बुमराहने यॉर्कर आणि स्लो बॉल याबद्दल मलिंगाकडून बरेच काही शिकले आहे.
बुमराहला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनविण्यात मलिंगाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनामुळे बुमराह आज जगातील प्रथम क्रमांकाचा गोलंदाज असल्याबद्दल मलिंगाला आनंद वाटत आहे.
“मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना बुमराहला मदत केल्याचा मला खरोखर आनंद झाला आहे. तो आता पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. आंनदी होऊन त्याला अशा टिप्स दिल्या ज्यामुळे तो त्याच्या कारकीर्दीतील माझे योगदान ओळखू शकेल.”
“मला वाटते प्रत्येकाने आपला अनुभव आणि कौशल्य तरुण खेळाडूंसह शेअर करायला हवे, ज्यामुळे क्रिकेटचा विजय होईल,” असे क्रिकेट.कॉमशी बोलताना मलिंगा म्हणाला.
“जसप्रीतकडे सल्ले घेण्यासाठी माझ्यापेक्षा चांगले पर्याय असू शकतात; तो असा आहे जो त्याला मिळणाऱ्या सल्ल्यांवर काम करु शकतो. तो ज्याप्रकारे यॉर्कर्स आणि स्लो बॉलची अंमलबजावणी करतो यावरुन हे स्पष्ट होते की तो किती अविश्वसनीय आहे. तो शिकण्यासाठी कायम तयार असतो,” असे तो पुढे म्हणाला.
मलिंगा आणि बुमराह या दोघांनाही आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सने संघात कायम केले आहे.
'द वॉल' राहुल द्रविडने दिला युवा खेळाडूंना हा महत्त्वाचा सल्ला…
वाचा👉https://t.co/RE3wtQg1RM👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 30, 2019
ज्या दिवशी ब्रॅडमनने पदार्पण केले होते त्याचदिवशी वॉर्नरने मोडला त्यांचा सर्वात मोठा विक्रम
वाचा👉https://t.co/YlYbMwClZl👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
#AUSvsPAK #DavidWarner #DonBradman— Maha Sports (@Maha_Sports) November 30, 2019