भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट क्लब यॉर्कशायरने या मोसमासाठी अश्विनबरोबरचा आपला करार रद्द केला आहे. खरंतर कोरोना व्हायरसमुळे १ जुलैपर्यंत इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे यॉर्कशायरने ३ परदेशी खेळाडूंचे करार रद्द करण्यात आले आहेत.
अश्विन व्यतिरिक्त केशव महाराज (Keshav Maharaj) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) या खेळाडूंचेही करार रद्द करण्यात आले आहेत. यॉर्कशायरने ट्वीट करत सांगितले की, “परस्पर संमतीने त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे.”
यॉर्कशायर क्रिकेटचे संचालक मार्टिन मोक्सन (Martyn Moxon) यांनी सांगितले की, “सर्वप्रथम आम्ही कोरोना व्हायरससारख्या भयानक साथीच्या रोगाच्या दरम्यानही खेळाडूंच्या आणि एजंटांच्या नियमित संपर्कात आहोत. ते अत्यंत व्यावसायिक आहेत.”
भारताचा स्टार फिरकीपटू अश्विनने यावर्षी जानेवारीमध्ये काऊंटी चॅम्पिनयशीप २०२०च्या मोसमासाठी यॉर्कशायरने (Yorkshire) करार केला होता. यापूर्वी अश्विन २०१७मध्ये वर्सेस्टरशायर (Worcestershire) आणि २०१९मध्ये नॉटींगहॅमशायरचा (Nottinghamshire) भाग राहिला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, काही क्रिकेट बोर्डांनी त्यांचा देशांतर्गत मोसमही बऱ्याच काळासाठी पुढे ढकलला आहे.
याव्यतिरिक्त या व्हायरसमुळे भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलदेखील (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयपीएलचे आयोजन जवळजवळ होणार नसल्याचे दिसत आहेत.
भारतातील ३१,४९० लोकांना या कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. तर १००८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वाचनीय लेख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहर
-बड्डे बाॅय आशिष नेहराची क्रिकेट कारकिर्द अशी राहिली
-का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?