भारतीय संघाने 2011 साली एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली तब्बल 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. अशात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 2011नंतर विश्वचषक न जिंकण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, विश्वचषक ही अशी स्पर्धा आहे, जी तुम्ही प्रत्येक वेळी जिंकू शकत नाही.
भारतीय संघाने अखेरचा विश्वचषक 2011 साली जिंकला होता. त्यानंतर 2013मध्ये आयसीसी ट्रॉफीही जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. भारतीय संघ सातत्याने उपांत्य आणि अंतिम सामन्यात जाऊन पराभूत होत आला आहे. आता वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धा भारतात आहे आणि भारतीय संघाकडून 140 कोटी भारतीयांना आशा आहेत.
काय म्हणाला गांगुली?
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यानुसार, विश्वचषकासारखी स्पर्धा जिंकणे इतके सोपे नसते. एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला की, “तुम्ही प्रत्येक वेळी विश्वचषक जिंकू शकत नाहीत. खराब वेळही येते आणि त्यामुळेच खूप अंतर निर्माण होते.”
चहलविषयी भाष्य
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली. मात्र, यात दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याला जागा मिळाली नाही. त्याविषयी बोलताना गांगुलीने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते, चहल फलंदाजी करू शकत नाही, कदाचित त्यामुळेच त्याची आशिया चषकाच्या संघात निवड झाली नाहीये. मात्र, तो अजूनही संघात पुनरागमन करू शकतो. तो असेही म्हणाला की, जर कोणताही खेळाडू पुढील काळात दुखापतग्रस्त झाला, तर चहलचे संघात पुनरागमन होऊ शकते.
गांगुली म्हणाला की, “संघाने युझवेंद्र चहलच्या जागी अक्षर पटेलला त्याच्या फलंदाजी क्षमतेमुळे प्राधान्य दिले आहे. माझ्या मते, हा चांगला निर्णय आहे. जर कोणीही दुखापतग्रस्त झाले, तर चहलचे पुनरागमन होऊ शकते. हा 17 सदस्यीय संघ आहे आणि त्यामुळेच दोन व्यक्तींना बाहेर केलेच जाईल.”
विश्वचषक स्पर्धा कधी होणार सुरू?
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर, 2023 रोजी अहमदाबादमध्येच खेळला जाणार आहे. (you can not win world cups all the time says former captain sourav ganguly)
हेही वाचा-
सेलिब्रेशन बनता है! रांचीत धोनीने सीएसके फॅनसोबत साजरा केला आनंद, व्हिडिओ पाहा
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी