क्रिकेट विश्वातील प्रत्येक दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीला एक महान कर्णधार मानतो. गांगुलीला भारतीय संघाचं कर्णधारपद त्यावेळी मिळालं, ज्यावेळी भारतीय क्रिकेटवर फिक्सिंगचा काळा डाग लागला होता. एवढं सगळं असूनही गांगुलीने परिस्थितीशी कधीही हार मानली नाही. त्याने युवा खेळाडूंच्या मदतीने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटला रुळावर आणलं.
कर्णधारपदाच्या काळात गांगुलीने (Saurav Ganguli) एमएस धोनी (MS Dhoni), युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांसारख्या अनेक युवा खेळाडूंना खूप पाठिंबा दिला. ज्यामुळे भारतीय संघाला पुन्हा जुनी ओळख मिळाली. खरं तर गांगुलीच्या कर्णधारपदाने भारतासाठी अमृत म्हणून काम केले. कारण कर्णधार होण्यापूर्वी मॅच फिक्सिंगमुळे भारतीय संघ पूर्णपणे विस्कळीत झाला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाला गांगुलीची साथ मिळाली आणि त्याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचा इतिहास पूर्णपणे बदलला.
गांगुलीने युवा खेळाडूंना दिलेला पाठिंबा हा मोलाचा असल्याचे सिद्ध झाले. म्हणूनच भारतीय संघ २००२ मध्ये नेटवेस्ट मालिका जिंकून २००३ च्या विश्वचषकात अंतिम सामना गाठण्यात यशस्वी ठरला. गांगुलीने एका ऍपवर संवाद साधताना सांगितलं, की तो खेळाडूंमधील कौशल्य ओळखून या गोष्टीचा निर्णय घ्यायचा, की कोणत्या खेळाडूला कोणती जबाबदारी दिली पाहिजे.
गांगुलीने असंही म्हटलं आहे, “त्याने कधीही खेळाडूंचा नैसर्गिक खेळ बदलण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच त्याच्या नेतृत्वात अनेक मोठे खेळाडू जन्माला आले. मग ते युवराज असो किंवा धोनी. युवराज सारखा खेळाडू कधीही द्रविड (Rahul Dravid) बनू शकत नाही आणि द्रविड कधीही युवराज बनू शकत नाही. कारण दोघांचा स्वभाव खूप वेगळा आहे. युवराज आक्रमक क्रिकेटपटू आहे. तर द्रविड शांत स्वभावाचा होता.”
गांगुली म्हणाला कर्णधार म्हणून आपण युवराजसारख्या खेळाडूनं द्रविडप्रमाणे वागण्याची अपेक्षा करू शकत नाही. युवराज आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जात होता, तर द्रविड खूप शांत खेळाडू होता. कोणत्याही मोठ्या नेत्याच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे, त्याची अनुकूलता म्हणजेच त्याने कोणत्याही वातावरणात स्वत: ला जुळवून घेतले पाहिजे.
एखाद्या कर्णधाराने आपल्या संघातील खेळाडूंच्या कौशल्यांचा योग्य वापर करायला हवा. युवराजला द्रविड आणि द्रविडला युवराज बनवता येणार नाही. एक चांगला नेता नेहमीच आपल्या चुकांमधून नवीन शिकतो. आणि अपयश त्याला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आपण अपयशी ठरल्यास निराश होऊ नये. आणि केवळ अयशस्वी होण्यापासून मिळालेले धडेच आपल्याला यशस्वी बनवतात, असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला रहावे लागणार ७ दिवस आयसोलेशन
-रोहितने ‘हे’ काम केले की तो कसोटी संघात फिट बसेल
-चहल हिशोबात रहा; एबी डिविलियर्स युझवेंद्र चहलवर संतापला!