जगभरात 25 डिसेंबरला ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. त्याचवेळी क्रिकेटचा हंगाम देखील शिगेला पोचलेला दिसून येतो. यावर्षीही ख्रिसमसच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही कसोटी सामने खेळले जाणार आहेत. एकीकडे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात रविवारी (25 डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसाचा खेळ होणार आहे. दुसरीकडे 26 डिसेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये पहिली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. 26 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या या कसोटी सामन्यांना ‘बॉक्सिंग डे कसोटी’ (Boxing Day Test) म्हटले जाते. मात्र, या बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास नक्की काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
बॉक्सिंग डे म्हणजे काय?
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसाला जगभरात बॉक्सिंग डे म्हणून ओळखले जाते. या बॉक्सिंग डेच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, ख्रिसमसच्या सुट्टीनंतर कामगार ज्यावेळी कामावर जात त्यावेळी मालक त्यांना भेटवस्तूचे बॉक्स देत. त्यामुळे या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले गेले. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, ख्रिसमसवेळी चर्चमध्ये ठेवलेल्या बॉक्समधील भेटवस्तू गरजूंना वाटप करण्याचा दिवस म्हणजे बॉक्सिंग डे. अशा आणखी काही आख्यायिका सांगितल्या जातात.
क्रिकेटमध्ये कधी झाला प्रवेश
बॉक्सिंग डेचा क्रिकेटमध्ये प्रवेश 1892 मध्ये झाला. 1892 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात ख्रिसमसच्या वेळी सामना झाला. यानंतर, दरवर्षी ख्रिसमसमध्ये दोन्ही संघांमधील सामने सुरू झाले आणि ती एक परंपरा बनली. प्रत्येक सामन्यात बॉक्सिंग डेचा दिवस नक्कीच समाविष्ट होता.
मेलबर्न येथे 1950-51 ऍशेसवेळी बॉक्सिंग डे दिवशी सामना खेळला गेला. हा सामना 22 डिसेंबरला सुरू झाला आणि सामन्याचा पाचवा दिवस बॉक्सिंग डेला आला. यानंतर, 1953 ते 1967 दरम्यान, बॉक्सिंग डे दिवशी एकही सामना खेळला गेला नाही. 1974-75 ऍशेस मालिकेतील तिसरा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डेला सुरू झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉर्थ ईस्ट युनायटेडने अखेर पहिला विजय मिळवला; एटीके मोहन बागानला धक्का दिला
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम