---Advertisement---

वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम

Alastair-Cook
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा आज (25 डिसेंबर) 38 वा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वर्षे इंग्लंडकडून खेळताना अनेक विक्रम केलेल्या कूकने 1-5 मार्च 2006 दरम्यान नागपूर येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

ऍलिस्टर कूक (Alastair Cook) याने 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 161 कसोटी सामने, 92 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले. यात त्याने अनुक्रमे 12472 धावा, 3204 धावा आणि 61 धावा केल्या.

कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहेत हे खास विक्रम-

-कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने 30 वर्षे 5 महिने आणि 5 दिवसांचा असताना कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने 30 मे 2016 ला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केला होता.

-ऍलिस्टर कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळ फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अबुधाबी येथे 13 ऑक्टोबर 2015 ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 836 मिनिटे फलंदाजी केली होती. या यादीत हानिफ मोहम्मद आणि गॅरी कर्स्टन अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.

-कूकने त्याच्या कारकिर्दीत सलग 159 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याने सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 161 कसोटी सामने खेळले आहेत. यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर आजारी असल्याने तो एका सामन्याला मुकला होता. त्यानंतर मात्र तो निवृत्त होईपर्यंत कधीही कसोटी सामन्यांना मुकलेला नाही.

विशेष म्हणजे कूकच्या पदार्पण ते निवृत्तीपर्यंत इंग्लंडने 162 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 161 सामन्यात कूकचा समावेश होता.

-कूक हा कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 161 कसोटी सामन्यात 45.35 च्या सरासरीने 12,472 धावा केल्या आहेत.
– इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही कूकच्या नावावर आहे.

https://twitter.com/ICC/status/1209670102171475969

-तसेच कूक हा कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या एकूण खेळाडूंमध्ये 10व्या क्रमांकावर असून इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 33 शतके केली आहेत.
– कसोटी क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज कूक म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

https://twitter.com/ICC/status/1039227008507670530?s=20&t=zJ-a1hG_86FLB9-q4Nr6cg

-कूकने इंग्लंडचे 2010 ते 2016 दरम्यान नेतृत्व केले असून तो इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणारा कर्णधार आहे. तो 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई सिटीच्या विजयाची ‘डबल’ हॅटट्रिक; चेन्नईयनला नमवून पुन्हा अव्वल स्थानी
पीव्ही सिंधू झळकली फोर्ब्सच्या यादीत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘या’ स्थानावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---