fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पराभवाचा राग मनात धरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना जीवे मारणार होता ‘हा’ भारतीय खेळाडू

मुंबई । भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत हा रागिष्ट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. विरोधी संघातल्या खेळाडूंना त्यांच्या भाषेतून उत्तर द्यायचा. दक्षिण आफ्रिका येथे २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताकडून खेळताना श्रीशांतने चांगली कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याने दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला.

एक सामना असाही होता की, ज्याच्यामुळे श्रीशांत हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जीवे मारणार होता. याचा खुलासा खुद्द श्रीशांतने एका टीव्ही कार्यक्रमात केला. २००३ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. हा पराभव श्रीशांतच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे श्रीशांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचा जीव घेणार होता.

श्रीसंथ म्हणाला, मला आठवते की मी मॅथ्यू हेडनला पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला होता. त्यावर त्याने चौकार ठोकला. हा सामना बारकाईने पाहिले तर मी खूप चांगले प्रदर्शन केलो होतो. मला फक्त ऑस्ट्रेलियाला हरवायचे होते. २००३ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तो पराभव आजही माझ्या डोक्यात होता. म्हणून मी त्यांना जीवे मारणार होतो.

तो पुढे बोलताना म्हणाला की, मला ऑस्ट्रेलिया खेळाडूंचा खूप राग येत होता. मी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत होतो. या सामन्यात मी खूप सारे डॉट बॉल्सही टाकलो. दोन चौकारांसह अवघ्या बारा धावा दिल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वचषकातील  सेमीफायनलच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात युवराज सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर ५ बाद १८८ धावा केल्या होत्या.

युवराजने ३० चेंडू ७० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला महेंद्रसिंह धोनीने ३६ धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. श्रीशांतने भेदक गोलंदाजी करत अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू  हेडन या स्फोटक फलंदाजांना बाद करून विजयाचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. भारताने हा सामना पंधरा धावांनी जिंकला.

You might also like