---Advertisement---

धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल

On: शनिवार, एप्रिल 25, 2020 12:11 PM
---Advertisement---

अनेकदा खेळाडू शरीर आणि आहाराची काळजी घेण्यासाठी महागड्या गोष्टी वापरताना दिसतात. यासाठी ते अगदी मिनरल वॉटर अर्थात पिण्याचे पाणी देखील महागड्यामहागड्या ब्रँडचे घेतात. आजकाल भारत आणि जगात खेळाडू आणि सेलेब्रिटी हे आपल्या शरीर आणि आहाराबद्दल काहीसे अधिकच जागरूक झालेले दिसतात.

पण याला अपवाद ठरला आहे तो भारताचा कॅप्टन कूल एमएस धोनी. एका इंग्रजी स्पोर्ट्स वेबपोर्टलनुसार गेल्या हंगामात आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या एका सामन्यादरम्यान स्ट्रॅटर्जिक टाईम आऊटच्या वेळी धोनी ‘बेली’ या ब्रँडचे पाणी पिताना दिसून आला होता. 

बेली’ या ब्रँडची 1 लीटर पाण्याची बाटली फक्त 20 रूपयांना मिळते.  यावरूनच धोनीचा साधेपणाचा अंदाज येतो.  धोनी नेहमीच त्याच्या साधेपणामुळे आणि त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. त्याच्या या स्वभावाचे सर्वांकडून कौतुकही होते.

https://twitter.com/funnyleone/status/991249669819981824

याआधी काही महिन्यांपूर्वी विराट कोहली पित असलेल्या पाण्याच्या खर्चाची बरीच चर्चा झाली होती. एव्हियन नावाचे मिनरल वाॅटर विराट रोज पितो. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे ६०० रुपये किंमत आहे. भारताच्या या कर्णधाराचा महिन्याचा पिण्याचा पाण्याचा खर्च अंदाजे ३६,००० रुपये एवढा आहे.
विराट कोहली जे पाणी रोज पितो ते फ्रान्सवरून येते. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे किंमत आहे ६०० रुपये. एव्हियन नावाचे मिनरल पाणी विराट रोज पितो. फ्रान्समधील ग्रामीण भागात जे नैसर्गिक झरे आहेत तिथेच हे पाणी मिळते. ह्या पाण्याच्या बाटल्या भारतात मोठ्या आणि छोट्या प्रकारात मिळतात. छोटी बाटली अंदाजे २४० रुपयांना मिळते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-रोहित शर्मासाठी हे आहेत सचिनबरोबर घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण

-सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

-गुड न्यूज- या देशात सुरु होणार शनिवारपासून क्रिकेटचे सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment