---Advertisement---

सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

On: शुक्रवार, एप्रिल 24, 2020 9:16 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज (२४ एप्रिल) ४७वा वाढदिवस आहे. या शुभ दिनानिमित्त त्याच्यावर अनेकांच्या शुभेच्छांचा भडीमार झाला. यात भारतीय क्रिकेटपटूचांही समावेश आहे.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सचिनला त्याचा आदर्श  मानतो. अशात आपल्या हिरोच्या वाढदिवसानिमित्त त्याने आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रहाणेने सचिनसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

व्हिडिओमध्ये रहाणे म्हणाला की, “मी १४ वर्षांचा होतो आणि माझ्या वाढदिवसादिवशी मी माझ्या प्रशिक्षकाला विनंती केली होती की मला सचिनला भेटायचे आहे. यानंतर माझ्या प्रशिक्षकाने सचिनला (Sachin Tendulkar) विनंती केली आणि आमच्या भेटीचा वेळ निश्चित झाला. सचिनने मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.३०वाजता भेटायला बोलावले होते. मी माझ्या हिरोला भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. त्या उत्साहाच्या भरात मी सकाळी ९.३० वाजताच माझ्या प्रशिक्षकाच्या घरी जाऊन बसलो होतो.”

पुढे बोलताना उजव्या हाताचा फलंदाज रहाणे म्हणाला, “मी जेवढा उत्साहित होतो तेवढाच घाबरलोही होतो. मी तेव्हा डोंबिवलीमध्ये राहत होतो. तिथून मला दादरला माझ्या प्रशिक्षकाच्या घरी जावे लागले होते. एवढ्या लवकर घरी गेल्यानंतर माझ्या प्रशिक्षकाने, आता मी इथे काय करतोय हे विचारले. त्यावर मी त्यांना म्हणालो, जर ट्रेनला उशीर झाला असता तर मलाही उशीर झाला असता म्हणून मी लवकर आलो. त्यावेळी मला सचिनशी भेटण्याची कोणतीच संधी गमवायची नव्हती.”

“मला व्यवस्थित आठवत नाहीये की मी त्यावेळेला काय करत होतो. पण मी त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेर फिरत होतो. मला तिथे ७ तास वाट पहावी लागली होती. पण मी सचिनला भेटायला इतका उत्साही होतो की वेळ कधी निघून गेला हेही मला कळले नाही. शेवटी ती वेळ आली आणि मी सचिनला भेटायला त्याच्या घरी गेलो. मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला आणि आम्ही क्रिकेटविषयी चर्चाही केली,” असे पुढे बोलताना रहाणेने सांगितले.

विशेष म्हणजे रहाणेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात सचिनसोबत क्रिकेट खेळले आहे. एका क्रिकेटपटूसाठी त्याच्या आदर्शाबरोबर खेळण्याची संधी मिळणे हा खूप मोठा क्षण असतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-लाॅकडाऊनमध्ये शिखर धवन ९९ धावांवर बाद, शतकी खेळीचे स्वप्न भंगले

-आयपीएलमध्ये ४ हजार धावा करणारे ७ भारतीय तर ३ परदेशी खेळाडू

-एवढ्या धावा करुनही आयपीएलमध्ये शतक न करता आलेले ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---