ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी प्रतिष्ठेचा असलेला भारत दौरा लवकरच सुरू होत आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळेल. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ 31 जानेवारी रोजी भारताकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी, या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेल्या युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. लान्स या मालिकेतून आपले कसोटी पदार्पण करू शकतो.
नुकताच क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात लान्स मॉरिस हा वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडू ठरला. देशांतर्गत हंगामात शानदार कामगिरी केलेल्या लान्स याला मागील महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले होते. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतात तो पदार्पण करू शकतो. भारताकडे रवाना होण्यापूर्वी त्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,
“भारतात खेळणे आव्हानात्मक असेल. ज्यांनी मला तेथील परिस्थिती सांगितली आहे, त्यानुसार मला गोलंदाजीसाठी तितकेसे पूरक वातावरण वाटले नाही. चेंडू वेगात जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावणे कठीण वाटते. मात्र, तरीदेखील अनुभव म्हणून मी या दौऱ्याकडे पाहतोय.”
तो पुढे म्हणाला,
“आमच्याकडे एक अनुभवी संघ आहे. मी प्रथमच संघासोबत विदेश दौऱ्यावर जातोय. मला स्वतःकडून तिथे काहीही अपेक्षा नाहीत. केवळ संधी मिळाल्यास चांगले करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. इथे शिकण्यासाठी भरपूर काही असेल. मला ती संधी गमवायची नाही.”
लान्स या संघाचा भाग असला तरी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोस हेजलवूड यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते. या मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होईल. त्यानंतर दिल्ली धर्मशाला व अहमदाबाद येथे मालिकेतील उर्वरित सामने खेळले जातील.
(Young Australian Pacer Lance Morris Talk On India Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स