भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर भारतातील मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. खरं तर, 24 जुलैपासून पाँडिचेरी येथे सुरू होत असलेल्या देवधर ट्रॉफी स्पर्धेसाठी अर्जुनची साऊथ झोन (दक्षिण विभाग) संघात निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व मयंक अगरवाल याच्याकडे आहे. अर्जुनने आतापर्यंत अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 7 सामने खेळले असून त्यात 8 विकेट्सही नावावर केल्या आहेत.
मागील वर्षी केले होते आयपीएल पदार्पण
डावखुरा गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संंघाकडून पदार्पण केले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने ऑगस्टमध्ये इमर्जिंग अष्टपैलूंच्या शिबिरात त्यालाही जागा दिली होती. साऊथ झोन (South Zone) संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये अर्जुनव्यतिरिक्त कर्नाटकच्या विद्वत कावेरापा, विजयकुमार वैशाक, आणि व्ही कौशिक यांनाही जागा मिळाली आहे.
साऊथ झोनमध्ये मोठ्या खेळाडूंचा समावेश
या संघात मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर यालाही जागा मिळाली आहे. अष्टपैलू सुंदर यावर्षीच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघाचा भाग होता. मात्र, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या पुनरागमनानंतर त्याला संघातून बाहेर पडावे लागले. या स्पर्धेत तो स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, देवदत्त पडिक्कल याचाही संघात समावेश आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत भारतीय संघात सामील होण्याच्या शर्यतीत असलेला पडिक्कल आता शर्यतीत खूपच मागे पडला आहे.
साऊथ झोन संघ
मयंक अगरवाल (कर्णधार), रोहन कुन्नुमल, एन जगदीशन, रोहित रायुडू, केबी अरुण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, वाशिंग्टन सुंदर, विद्वत कावेरापा, विजयकुमार वैशाक, कौशिक वी, रोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडुलकर आणि बी साई किशोर (young cricketer arjun tendulkar in south zone squad for deodhar trophy)
महत्वाच्या बातम्या-
विंडीजविरुद्ध फक्त 3 विकेट्स घेताच अश्विन रचणार विश्वविक्रम! कपिल पाजींनाही जमली नाही ‘अशी’ कामगिरी
कधी आणि कुठे पाहायचा IND vs WI पहिला कसोटी सामना? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती