---Advertisement---

ICC Rankings: शुबमन गिल नंबर 1 बनण्याच्या खूपच जवळ, पाकिस्तानी कर्णधाराचे स्थान धोक्यात

On: बुधवार, सप्टेंबर 27, 2023 5:18 PM
Shubman-Gill
---Advertisement---

आयसीसीने बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) वनडे रँकिंग जारी केली. भारतीय संघाचा तुफान फॉर्ममध्ये असलेला स्टार सलामीवीर शुबमन गिल याला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला. त्याने पाकिस्तानचा कर्णधार आणि आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असलेला खेळाडू बाबर आझम याच्या स्थानाला धोका निर्माण केला आहे. असे असले, तरीही शुबमन अजूनही जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला नाहीये. मात्र, तो अव्वल स्थानाच्या खूपच जवळ पोहोचला आहे. आता अशी आसा व्यक्त केली जात आहे की, विश्वचषक 2023 स्पर्धेत बाबर आजम याच्याकडून वनडे रँकिंगमधील अव्वलस्थान हिसकावेल.

शुबमन गिल 10 गुणांनी मुकला अव्वलस्थान
आयसीसीच्या जारी केलेल्या फलंदाजांच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये बाबर आझम (Babar Azam) अव्वलस्थानी कायम आहे. त्याची रेटिंग 857 इतकी आहे. त्याच्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) 847 गुणांसोबत दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या रेटिंगमध्ये खूपच सुधारणा झाली आहे. म्हणजेच तो आता बाबरपासून फक्त 10 रेटिंगने दूर आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मध्ये फक्त 10 रेटिंगचे अंतर राहिले आहे. दुसरीकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मध्ये खूपच जास्त अंतर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी व्हॅन डर डुसेन आहे. त्याची रेटिंग 743 इतकी आहे. आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर 729 रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे. तसेच, पाचव्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक आहे. त्याची रेटिंग 728 आहे.

विराट आयसीसी रँकिंगमध्ये नवव्या, तर रोहित अव्वल 10 खेळाडूंच् यादीतून बाहेर
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये डेविड वॉर्नर सहाव्या स्थानी आहे. त्याची रेटिंग 720 आहे. त्याच्यानंतर 714 गुणांसह सातव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. तसेच, त्याच्याच देशाचा सहकारी हेन्रीच क्लासेन 698 रेटिंगसह आठव्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली नवव्या स्थानी आला आहे. त्याची रेटिंग 694 इतकी आहे. त्यानंतर दहाव्या स्थानी फखर जमान आहे. त्याची रेटिंग 692 आहे. म्हणजेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा अव्वल 10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला आहे. (young cricketer shubman gill missed out the no 1 odi ranking by just 10 points 2023)

हेही वाचा-
भारताच्या ‘सोन’पऱ्या! Asian Gamesमध्ये देशाच्या खात्यात ‘सुवर्ण’ पदकांचा पाऊस, सिफ्तने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड
मिचेल मार्श आणि शतकामध्ये भिंत बनला कुलदीप! सलामीवीर फलंदाज ‘नर्व्हस नाईंटी’वर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---