ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श बुधवारी (27 सप्टेंबर) जबरदस्त फॉर्ममध्ये होते. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्श शतक करण्यासाठी पूर्णपणे तयारहोता. मात्र कुलदीप यादव याने टाकेलल्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने त्याने विकेट गमावली. अवघ्या चार धावा कमी पडल्यामुळे मार्शचे शतक होऊ शकले नाही.
उभय संघांतील ही वनडे मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. परिणामी संघाला मालिकाही गमवावी लागली. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघ अगदी पहिल्या चेंडूपासून चांगले प्रदर्शन करताना दिसला. सलामीवीर मिचेल मार्श याने 84 चेंडूत 96 धावांची खेळी करून विकेट गमावली. डावातील 28व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडूवर मार्शने प्रसिद्ध कृष्णा याच्या हातात झेल दिला आणि ‘नर्वस नाईंटी’वर तंबूत परतला. मार्शच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 215 धावा होती. (Kuldeep Yadav took the wicket of Mitchell Marsh on a nervous ninety)
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
खूपच कमी डावांमध्ये स्मिथने पूर्ण केल्या 5000 वनडे धावा, खास यादीत मिळवला चौथा क्रमांक
कृष्णा जोमात, वॉर्नर कोमात! सलग तिसरे अर्धशतक ठोकणाऱ्या स्टार फलंदाजाचा प्रसिद्धने केला खेळ खल्लास