देशभरात अलिकडच्या काळात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये लाईव्ह क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी आपले प्राण गमावले आहेत. यातील काहींनी मैदानात धावता-धावता जीव गमावला, तर काहींना दुखापत झाल्यामुळे शेवटचा श्वास घ्यावा लागला. आता ताजी बातमी जम्मू-कश्मीरमधून येत आहे. येथील एका युवा क्रिकेटपटूचा लाईव्ह सामन्यात मृत्यू झाला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार 20 वर्षीय युवा गोलंदाजाने मैदानात रनअप घेताना जीव मगावला आहे. सुहैब यासीन (Suhaib Yaseen Death) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. त्याला जुनेद या नावानेही ओळखला जायचे. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद यासीन असे आहे. तो बारामुलाच्या हांजीवेरा याठिकाणचा राहणारा होता. जम्मू कश्मीरच्या एका वृत्तसंस्थेने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
वृत्तानुसार जीव गमावलेल्या खेळाडूचे नाव सुहैब यासीन होते. ही घटना शुक्रवारी (26 जानेवारी) बारामुला पट्टन स्थित हाजीवेरा याठिकाणी ही घटना घडली. माहितीनुसार 20 वर्षीय खेळाडू गोलंदाजी करताना रनअप घेत होता. पण यादरम्यानच अचानक तो जमनीवर पडला. मैदानात उपस्थित असलेल्या इतरांनी त्याला तत्काळ रुग्णालयात देखील नेले. पण रुग्णालयात पोहोचल्याबरोबर त्याला मृत घोषित केले गेले.
In the wake of tragedy, Pattan grieves the loss of Suhaib Yaseen, a spirited soul who met an untimely end on the cricket field today. The pain is shared by the entire people of Pattan. My thoughts are with Suhaib’s family as they navigate this profound sorrow. May we collectively…
— Imran Reza Ansari (@imranrezaansari) January 26, 2024
प्राथमिक माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, युवा खेळाडूचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे. काही दिवसांपूर्वी नॉयडामध्येही असीच एक घटना घडली होती. यासीनच्या मृत्यूबाबत पोलीस प्रशासन अधिकचा तपास घेत आहे.
याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही काही वेळा खेळाडूंवर मैदानात जीव गमावण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिल ह्यूज याच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे जीव गमवाव लागला होता. त्याचसोबत भारताचे रमन लांबा यांनाही मैदानात अखेरचा श्वास घ्यावा लागला होता. (Young cricketer Suhaib Yasin died in a live match in Jammu and Kashmir)
महत्वाच्या बातम्या –
अपील न करता अंपायरने दिले आऊट, पाकिस्तान क्रिकेटमध्ये घडली एक रंजक घटना, पाहा व्हिडिओ
‘विराट कोहली असता तर…’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केएल राहुलचे शतक हुकण्याबाबत केले मोठे वक्तव्य