नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिका संपली. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ‘शुबमन गिल’च्या (Shubman Gill) अनुपस्थितीत भारताचा युवा खेळाडू ‘देवदत्त पडिक्कल’ला (Devdutt Padikkal) संधी मिळाली होती. त्यामध्ये त्याने एका सामन्याच्या 2 डावात 0 आणि 25 अशा धावा केल्या. तत्पूर्वी देवदत्त पडिक्कलने आता चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दरम्यान त्याने मंगळवार (7 जानेवारी) रोजी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.
24 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने एका ऑस्ट्रेलियन मुलाबद्दल सांगितले, जो उत्सुकतेने नवीन बॅट आणि गियर शोधत होता. हे पाहून पडिक्कल भावूक झाला आणि त्याला त्याचे बालपण आठवले. पडिक्कलने हा क्षण आणखी खास बनवला. त्याने त्या मुलाच्या क्रिकेटच्या साहित्यासाठी पैसे दिले.
पडिक्कलने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहले की, “आज या लहान मुलाला क्रिकेटच्या दुकानात पाहिलं. तो त्याच्या आईसोबत होता. तो नवीन बॅट आणि इतर उपकरणे शोधत होता. हे पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि दुकानातील असे दिवस किती संस्मरणीय होते. मी त्याला हवे ते विकत घेण्याची ऑफर दिली. जेणेकरून त्याचा दिवस आणखी खास बनवता येईल.”
शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या अनुपस्थितीत डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत खेळला. पर्थ कसोटीत खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या डावात त्याने 25 धावा केल्या. भारताने हा सामना 295 धावांनी जिंकला होता.
देवदत्त पडिक्कलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलाचये झाले, तर त्याने भारतासाठी 2 कसोटी आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. 2 कसोटी सामन्यात त्याने 3 डावात फलंदाजी करताना 90 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 30 राहिली. तर त्याने 1 अर्धशतक देखील झळकावले आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे. 2 टी20 सामन्यात त्याने 38 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 19 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हा गोलंदाज असता तर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली असती, पाँटिंगचे धक्कदायक विधान
हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पात्र नाही, पण तरीही त्याला संधी मिळणार
गौतम गंभीरचं पद धोक्यात? बीसीसीआय लवकरच पाहणार रिपोर्ट कार्ड!