भारताचा तरुण टेनिसपटू रामकुमार रामनाथनने कारकिर्दीतील सर्वोच्च एटीपी क्रमावरीवर झेप घेतली आहे. सोमवारी घोषित झालेल्या एटीपी क्रमवारीत तो १८४व्या स्थानी आहे.
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अंटालिया ओपनमधील कामगिरीचा रामकुमार रामनाथनला जबदस्त फायदा झाला आहे. त्यामुळे त्याला तब्बल ३८ स्थानांचा फायदा झाला आहे. तो एटीपी २५० स्पर्धेला पात्र ठरला होता आणि यात त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने स्पर्धेत एकूण ५७ गुणांची कमाई केली.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये युकी भाम्बरी (२२२), प्रजनेश गुंनेश्वरन (२५९), एन बालाजी श्रीराम (२९१) आणि सुमित नागल (३४२) व्या स्थानावर आहेत.
पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा (२१), पूर्व राजा (५७), दिविज शरण (५७), लिएंडर पेस (६२) तर जीवन नेदुनचेझियान (९०) व्य स्थानी आहेत.
डब्लूटीए महिला दुहेरी रँकिंगमध्ये सानिया मिर्झा (७) वर असून महिला एकेरीमध्ये अंकिता रैना (२७४) तर करमान कौर थंडी (४१३) व्य स्थानी आहे.