ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काहीतरी प्रकार घडत असतो, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतो. या स्पर्धेतील १२ वा सामना होबार्ट हरिकेंस आणि पर्थ स्कॉर्चर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात असा काही प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्याचा आनंद घेण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानात येत असतात. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंतचा समावेश असतो. क्रिकेट सामना म्हटलं तर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणे स्वाभाविक आहे. अशावेळी प्रेक्षकांना चेंडू लागण्याची भीती असते. असाच काहीसा प्रकार होबार्ट हरिकेंस आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात झालेल्या सामन्यात घडला.
तर झाले असे की, होबार्ट हरिकेंस संघाची फलंदाजी सुरू असताना, ७ वे षटक टाकण्यासाठी अँड्र्यू टाय गोलंदाजीला आला होता. त्यावेळी अँड्र्यू टायने फुल टॉस चेंडू टाकला, ज्यावर फलंदाजाने मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. हा षटकार पाहून होबार्ट हरिकेंस संघाचे प्रेक्षक उत्साहित झाले होते.
दरम्यान, स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाच्या डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर त्याने पाहिले, तेव्हा त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले होते. हे पाहून समालोचक देखील आश्चर्यचकित झाले होते. हा व्हिडिओ बिग बॅश लीग स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
OUCH 🤕 the Canes are smacking sixes aplenty at Hobart – and Old Mate tried to catch this one with his face… #BBL11 pic.twitter.com/rcpbzPgV7j
— KFC Big Bash League (@BBL) December 14, 2021
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पर्थ स्कॉर्चर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून मिचेल मार्शने नाबाद १०० धावांची खेळी केली. लॉरी एवंसने ४० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १८२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना होबार्ट हरिकेंस संघाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ४१ तर डार्सी शॉर्टने ३१ धावांची खेळी केली. परंतु, होबार्ट हुरिकेंस संघाचा संपूर्ण डाव १२९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना पर्थ स्कॉर्चर्स संघाने ५३ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
ना विराट… ना रोहित… ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार? बीसीसीआय देणार मोठा धक्का?
प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”
भारतीय क्रिकेटमधील कलहाचे कारण आयपीएल? धक्कादायक माहिती आली समोर