मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत मंगळवारी (१७ मे) ६५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या रोमांचकारी सामन्यात अखेरच्या षटकात सनरायझर्स हैदराबादने ३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने प्लेऑफसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. हैदराबादच्या या विजयात वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचाही महत्त्वाचा वाटा राहिला.
उमरान मलिकने जसप्रीत बुमराहला टाकले मागे
आपल्या अतिशय वेगवान गोलंदाजीसाठी नावारुपाला आलेल्या उमरान मलिकने मुंबई विरुद्ध ३ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने इशान किशन, डॅनिएल सॅम्स आणि तिलक वर्मा या तीन खेळाडूंना बाद करत सनरायझर्सला सामन्यात पूनरागमन करून दिले.
याबरोबरच उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएल २०२० मध्ये (IPL2022) १३ सामन्यांत २१ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो एका आयपीएल हंगामात २० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा सर्वात कमी वयाचा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मंगळवारी जेव्हा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) झाला, तेव्हा उमरान मलिकचे वय २२ वर्षे १७६ दिवस होते. त्यामुळे त्याने जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) विक्रम मोडला आहे.
जसप्रीत बुमराहने ५ वर्षांपूर्वी २०१७ साली आयपीएलच्या हंगामात २३ वर्षे १६५ दिवस वय असताना २० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आरपी सिंग आहे. त्याने २००९ मध्ये २३ वर्षे १६६ दिवस वय असताना आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात २० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. तसेच चौथ्या क्रमांकावर प्रज्ञान ओझा असून त्याने २३ वर्षे २२५ दिवस वय असताना २०१० सालच्या आयपीएल हंगामात २० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला होता (Youngest Indian bowler to take 20+ wickets in an IPL season).
सनरायझर्सने मिळवला विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे हैदराबादनेही प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १९३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तसेच प्रियम गर्गने ४२ धावांचे आणि निकोलस पूरनने ३८ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून रमनदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शानदार सुरुवात केली. या दोघांनीही ९५ धावांची भागीदारी केली. पण, दोघांनाही त्यांचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. रोहित ४८ आणि इशान किशन ४३ धावांवर बाद झाले. त्यानंतर टीम डेव्हिनने तुफानी खेळासह ४६ धावा करताना मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, तो धावबाद झाला. अखेर मुंबईला २० षटकात ७ बाद १९० धावाच करता आल्याने पराभव झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याला सीपीआर दिला, वाचवण्यासाठी अगदी…’, बघा सायमंडच्या शेवटच्या क्षणी काय काय घडलं
प्लेऑफच्या शर्यतीत संघ असतानाच कर्णधार मायदेशी रवाना, हैदराबादच्या ताफ्यात गडबड
मोठ्या मनाचा माही! १६ वर्षीय चाहत्याच्या खास पत्राचे ‘कॅप्टनकूल’ धोनीकडून ‘या’ शब्दात कौतुक