भारतीय संघात असे काही युवा खेळाडू आहे, जे अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून वादळी खेळण्याची क्षमता राखतात. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होता. गिल सध्या भलत्याच फॉर्मात आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक ठोकले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाहेर बसल्यानंतर इंदोर कसोटीत केएल राहुल याच्या जागी गिलला ताफ्यात सामील करण्यात आले होते. त्या सामन्यात तो खास कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, आता त्याने अहमदाबादमध्ये शतक ठोकले आहे. यासोबतच त्याने एक खास विक्रम नावावर केला आहे.
गिलचे कसोटीतील दुसरे शतक
कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेला शुबमन गिल (Shubman Gill) याने शानदार शतक साजरे केले. त्याने 194 चेंडूचा सामना करत शतक साजरे केले. हे त्याचे कसोटीतील दुसरे शतक होते. 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटीत पदार्पण करणाऱ्या गिलने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध आपले पहिले शतक झळकावले होते. तरीही, रोहितच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागले. मात्र, राहुलच्या खराब फॉर्मामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली. तसेच, गिलने 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. तो या कसोटीत रोहितनंतर शतक करणारा दुसरा भारतीय आहे. विशेष म्हणजे, त्याने एक खास कारनामा केला आहे.
Shubman Gill’s second Test hundred drives India’s fightback.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/gRWYi8qm50
— ICC (@ICC) March 11, 2023
गिलचा शानदार विक्रम
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावताच गिलच्या नावावर एक खास विक्रमाची नोंद झाली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा सलामीवीर फलंदाज बनला. त्याने 23 वर्षे आणि 182 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणाऱ्या युवा भारतीय सलामीवीरांच्या यादीत अव्वलस्थानी केएल राहुल (KL Rahul) आहे. त्याने 22 वर्षे आणि 263 दिवसांच्या वयात शतक ठोकले होते. त्याच्याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) असून त्याने 25 वर्षे आणि 62 दिवसांच्या वयात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केले होते.
Take a bow, Shubman Gill 🫡#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/M8U2gneid8
— BCCI (@BCCI) March 11, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक करणारे युवा भारतीय सलामीवीर
22 वर्षे आणि 263 दिवस- केएल राहुल
23 वर्षे आणि 182 दिवस- शुबमन गिल*
25 वर्षे आणि 62 दिवस- व्हीव्हीएस लक्ष्मण
पुजारासोबत 113 धावांची भागीदारी
शुबमन गिल याने पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा याच्यासोबत 74 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी त्याने चेतेश्वर पुजारा याच्यासोबत 113 धावा चोपल्या. यामध्ये पुजाराच्या 42 आणि गिलच्या 64 धावांचा समावेश आहे. गिलच्या शतकानंतर पुजारा टॉड मर्फी याच्या चेंडूवर पायचीत बाद झाला. (Youngest Indian opener to hit a century against Australia see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक
पंत नाहीये म्हणून काय झालं, दिल्लीला मिळाला नवीन पॉवर हिटर; बाबरच्या संघाविरुद्ध ठोकलं वेगवान शतक