गयाना। आज(6 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना प्रोविडन्स स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातून भारताचा युवा गोलंदाज राहुल चाहरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणारा 81 वा खेळाडू ठरला आहे. त्याला भारतीय संघाची कॅप कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते देण्यात आली. याबरोबरच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा राहुल चौथ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे.
आज पदार्पण करताना राहुलचे वय 20 वर्षे 2 दिवस एवढे आहे. भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याच्या यादीत राहुलने सुरेश रैनाला मागे टाकले आहे. रैनाने 20 वर्षे 4 दिवस एवढे वय असताना भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले होते.
या यादीत अव्वल क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर आहे. त्याने 18 वर्षे 80 दिवस एवढे वय असताना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले होते.
भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणारे क्रिकेटपटू –
18 वर्षे 80 दिवस – वॉशिंग्टन सुंदर
19 वर्षे 120 दिवस – रिषभ पंत
19 वर्षे 152 दिवस – इशांत शर्मा
20 वर्षे 2 दिवस – राहुल चाहर
20 वर्षे 4 दिवस – सुरेश रैना
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तिसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; रोहित, जडेजाला विश्रांती
–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का!
–भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्याआधी किरॉन पोलार्डला झाली मोठी शिक्षा