---Advertisement---

मूर्ती लहान कीर्ती महान! कर्णधारपदाचं शिवधनुष्य उचलताच पंतच्या नावावर खास विक्रम, धोनीलाही पछाडलं

On: बुधवार, जून 8, 2022 9:28 PM
MS-Dhoni-And-Rishabh-Pant
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले. त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सध्यातरी कुणालाच घेतले नाही. मात्र, संघाची धुरा आता रिषभ पंत याच्या खांद्यावर सोपवली आहे. यामुळे आता पंतच्या नावावर खास विक्रम झाला आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे भारतीय टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यामुळे तो सर्वात कमी वयात भारताचा कर्णधार बनणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने २४ वर्षे आणि २४९ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे. मात्र, ही कामगिरी सामना सुरू झाल्यानंतरच सत्यात उतरेल. पंत पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताच २३ वर्षे आणि २५० दिवसांच्या वयात अशी कामगिरी करणारा युवा कर्णधार ठरेल. या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना (Suresh Raina) आहे. रैना २३ वर्षे आणि १९७ दिवसांच्या वयात भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनला होता. रैनाने ३ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.

या यादीत तिसऱ्या स्थानी ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) म्हणून ओळखला जाणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni) याचा समावेश आहे. धोनीने २६ वर्षे आणि ६८ दिवसांच्या वयात भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदाचं शिवधनुष्य उचललं होतं. त्याने ७२ सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्यानंतर चौथ्या स्थानी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचा समावेश आहे. रहाणेने २८ वर्षे आणि ४१ दिवसांच्या वयात ही कामगिरी फत्ते केली होती. रहाणेला त्याच्या कारकीर्दीत फक्त २ सामन्यात भारतीय टी२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारे युवा कर्णधार
२३ वर्षे १९७ दिवस- सुरेश रैना
२४ वर्षे २४९ दिवस- रिषभ पंत*
२६ वर्षे ६८ दिवस- एमएस धोनी
२८ वर्षे ४१ दिवस- अजिंक्य रहाणे

रिषभ पंतची टी२० कारकीर्द
रिषभ पंतने भारताकडून आतापर्यंत ४३ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३७ डावात फलंदाजी करताना २४.३९च्या सरासरीने ६८३ धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकही झळकावले होते.

मानलं भावा! लग्नाच्या ७ दिवसानंतर चेन्नईचा १४ कोटींचा हुकमी एक्का मैदानात परतला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---