इराणी ट्रॉफी स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया संघात सुरू असलेल्या सामन्यात एका युवा फलंदाजाने अक्षरश: राडा घातला आहे. या फलंदाजाने त्याच्या बॅटमधून पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावले होते. त्यानंतर आता दुसऱ्या डावातही त्याने शानदार शतक झळकावले आहे. यामुळे रेस्ट ऑफ इंडिया मजबूत स्थितीत दिसत आहे. ही कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल होय. विशेष म्हणजे, या द्विशतकी आणि शतकी खेळीमुळे 21 वर्षीय जयस्वालने नावावर इतिहास रचला आहे. तो अशी कामगिरी पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांनाही अशी कामगिरी करता आली नाहीये.
यशस्वी जयस्वालने ठोकले शतक
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही धमाका केला. त्याने इराणी ट्रॉफी (Irani Trophy) स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकत इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जयस्वालने 213 धावांची खेळी साकारली होती. आता दुसऱ्या डावातही त्याने शानदार शतक झळकावले आहे. अशाप्रकारे तो इराणी ट्रॉफीमधील एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा भारताचा पहिलाच फलंदाज बनला आहे.
त्याच्यापूर्वी शिखर धवन याने इराणी ट्रॉफीमध्ये एका सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले होते. मात्र, त्याला द्विशतक करता आले नव्हते. जयस्वालने पहिल्या डावात 30 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 213 धावा चोपल्या होत्या. तसेच, आता दुसऱ्या डावात त्याने 16 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 144 धावा केल्या.
Followed up his double century in the first innings with a 💯 in the second, Yashasvi Jaiswal was on 🔥
Give it up for @ybj_19👏#MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/1G8n9swbXA
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 4, 2023
Lunch on Day 4 of the #MPvROI clash in the @mastercardindia #IraniCup! @ybj_19's 121* extends Rest of India's lead to 391 runs
We will be back shortly for the second session of the day.
Scorecard 👉 https://t.co/UMUCM30e11 pic.twitter.com/d0J4gB1otS
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2023
रेस्ट ऑफ इंडियाकडे 435 धावांची आघाडी
यशस्वी जयस्वालच्या शानदार फलंदाजीमुळे रेस्ट ऑफ इंडिया संघाने 435 धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मध्यप्रदेश संघाने 29 षटकात 2 विकेट्स गमावत 81 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी 356 धावांची गरज आहे. अशात मध्यप्रदेशसाठी हे आव्हान गाठणे खूपच कठीण असल्याचे दिसत आहे. (youngster yashasvi jaiswal double century and century in same irani trophy match madhya pradesh vs rest of india match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘याचा एक पाय चंदीगडमध्ये आणि दुसरा…’, श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज
बॅटच्या मधोमध लागला चेंडू, कर्णधाराने झटकन घेतला रिव्ह्यू; आता जगभरात उडवली जातेय खिल्ली, पाहा व्हिडिओ