पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने विराट कोहलीवर मोठे वक्कव्य केले आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने विराट कोहलीवर वक्तव्य सगळीकडे व्हायरल होत आहे. वास्तविक, आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 चे आयोजन पाकिस्तान येथे करण्यात आले आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानत न जाण्याच्या भूमिकेत आहेत. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमधील सुरक्षेचा धोका लक्षात घेता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार नाही. मात्र, आता पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानने विराट कोहलीवर मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यूनुस खानने न्यूज 24 चॅनेलशी बोलताना आपले मत मांडला आहे. यूनुस खान म्हणाला, विराट कोहलीला चॅम्पियन्स 2025 साठी पाकिस्तानमध्ये यायला पाहिजे, असे आमची इच्छा आहे. मला वाटते की, विराट कोहलीच्या करिअरमध्ये एकच गोष्ट राहिली आहे. ते म्हणजे पाकिस्तान दाैरा आणि पाकिस्तानमध्ये खेळताना चांगले प्रदर्शन करणे. मात्र, भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जातो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलाच तापला आहे.
याआधी चॅम्पियन्स ट्राॅफी शेवटच्या वेळी 2017 मध्ये खेळवली गेली होती. तेव्हा इंग्लंडने या स्पर्धेचे यजमानपद केले होते. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने भारतीय संघाला फायनलमध्ये हरवून ट्राॅफीवर कब्जा केले होते. असो, आता पाकिस्तान आयसीसी चॅम्पिन्स ट्राॅफी 2025 चे यजनमानपद करण्यााठी तयार आहे.
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हारवून विश्वविजेता ठरला होता. या यशानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 फॉरमॅटला अलविदा केला.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल आरसीबीत; रोहित-बुमराह अन् सूर्या मुंबईची साथ सोडणार? आयपीएल 2025 पूर्वी सर्व मोठे अपडेट्स जाणून घ्या
सामना हरल्यानंतरही नेपाळ संघाने जिंकले 140 कोटी भारतीयांची मने, पाहा स्मृती मंधानाला काय दिले?
‘टीम इंडिया’ या 5 खेळाडूंपासून जरा जपूनचं, नाही तर होऊ शकतो टी20 मध्ये खेळ खराब