भारताचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार प्रदर्शन करत आहे. अनेक युवा खेळाडू विराटच्या फलंदाजी शैलीला प्रभावित होऊन स्वत:ची फलंदाजी शैली बदलण्याचा प्रयत्नात असतात. तसं पहिलं तर, विराटप्रमाणे बनणे हे तेवढे सोपे काम नाही.
परंतु, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, पाकिस्तानचा नवनियुक्त कर्णधार बाबर आझम हा पाकिस्तानचा विराट आहे. म्हणजे त्यांनी आझमची तुलना विराटसोबत केली आहे. असे असले तरी, पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनूस खानला वाटते की, आझमला विराटप्रमाणे बनण्यासाठी अजून ५ वर्षे तरी लागतील. Younis Khan Said Babar Azam Will Take 5 Years To Be Like As Virat Kohli
काल (१० जून) या गोष्टीविषयी बोलत युनूस यांनी सांगितले की, “विराटसोबत आझमची तुलना करणे योग्य नसेल. विराट आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि जगातील टॉप फलंदाज आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळत आहे. आझमही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळला आहे. परंतु, विराटने क्रिकेट क्षेत्रात जे काही मिळवले आहे. ते मिळवण्यासाठी आझमला ५ वर्षे तरी लागतील. आझमने ती उपलब्धी साध्य केल्यानंतर त्याची विराटसोबत तुलना करणे योग्य असेल.”
आझमला पाकिस्तान क्रिकेट संघाचा महत्त्वाचा फलंदाज समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ शतके करणाऱ्या आझमविषयी बोलताना युनूस म्हणाले, “आझमवर या गोष्टीचा जास्त दबाव निर्माण नाही केला पाहिजे. आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. जेणेकरुन तो भविष्यात सचिन तेंडुलकर किंवा जावेद मियांदादसारखा महान खेळाडू बनू शकेल.”
केवळ यूनुस यांनाच वाटत नाही की, आझमची तुलना विराटसोबत केली गेली नाही पाहिजे. तर, स्वत: आझमलाही असे वाटते. याविषयी बोलताना आझमने म्हटले होते की, “विराट सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. मी अजून खूप मागे आहे. मला अजूनही खूप काही साध्य करायचे आहे. मी नक्की विराटसारखे खेळण्याचा प्रयत्न करेन. अनेक विक्रम बनवेन आणि पाकिस्तानला अनेक सामने जिंकवून देण्याचा प्रयत्न करेन.”
ट्रेंडिंग घडामोडी-
भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘समाजात घर न मिळणेदेखील एक प्रकारचा…
जेव्हा एक दिग्गज यष्टीरक्षकच होतो धोनीचा चाहता, पहा काय आहे हे प्रकरण
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे आनंदाची न्यूज, आयसीसी टी२० विश्वचषकाची…