इंग्लंडचा सलामीवीर टॉम बँटन त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीमुळे ओळखला जातो. देशांतर्गत टी-20 स्पर्धेत टॉम बँटनने निर्भय आणि सकारात्मक क्रिकेट खेळूनही बरीच ओळख निर्माण केली आहे. पण अति आक्रमकतेमुळे हा खेळाडू एका चांगल्या प्रारंभाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकत नाही. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने याच मुद्द्यावरुन टॉम बँटनला खूप ऐकवले आहे.
केव्हिन पीटरसनला हा तरुण फलंदाज 30 धावा केल्यानंतर आपली विकेट फेकतो, हे आवडलेले नाही. पीटरसनने बँटनला विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरला बघून त्यांच्याकडून शिकावे असे आवाहन केले आहे. त्याला वाटते की, बँटनमध्ये अफाट प्रतिभा आहे. परंतू, तो त्याचा पुरेपूर वापर करत नाही.
बँटनला उद्देशून पीटरसन म्हणाला, “तुम्हाला जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना बारकाईने पाहावे लागेल. ते फलंदाजी करताना किती वेळा तरी मनामध्ये विचार करतात की, मला हवेत एखादा मोठा फटका मारायचा आहे किंवा या चेंडूवर एक षटकार मारायचा आहे. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर बघा. ते कशाप्रकारे सलामीला फलंदाजी करतात. कोहलीला त्याच्या डावाच्या सुरुवातीला षटकार मारताना तुम्ही किती वेळा पाहिले आहे? सांगण्याचा हेतू इतकाच की, परिस्थितीनुसार फलंदाजी करावी. बँटनला इतरांकडून शिकावे लागेल आणि प्रत्येक चेंडू हवेत टोलवण्याऐवजी काही साधारण व बचावात्मक शॉट खेळायला शिकावे लागेल.”
पीटरसन पुढे म्हणाला, “त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे. पण सध्या तो आपल्यातील प्रतिभेला वाया घालवत आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये अंतर असेल तर त्याचा फायदा घ्यायला शिका. एखाद्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोरात फटका मारायला शिकावे लागते. मिड-विकेटला जोरदार शॉट खेळावा लागतो.”
सध्या इंग्लंडमध्ये चालू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेतील शेवटच्या पाच सामन्यांमध्ये 22 वर्षीय बँटनने 36, 0, 5, 2 आणि 15 धावा केल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ब्रॉडचे तुटले हृदय, केली भावनिक पोस्ट शेअर
मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास