भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने युथ ऑलिंपिकमध्ये पुरूषांच्या 10 मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. ही स्पर्धा अर्जेंटीनाच्या ब्युनोस आयरसमध्ये सुरू आहे.
16 वर्षीय सौरभचे हे तिसरे मोठे पदक असून त्याने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
यावेळी सौरभने आठ जणांच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदकाचा वेध घेताना 244.2चा शॉट मारला. त्याने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये वरिष्ठ गटापेक्षा 1.9 जास्त असा 245.5 असा विक्रमी शॉट मारला होता.
बुधवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या या फेरीत त्याने परत एकदा वरिष्ठ गटाला डालवत 0.6 गुण अधिक मिळवले. पण हा शॉट कुमार गटात मारल्याने त्याला वरिष्ठ गटात स्थान दिले जाणार नाही.
रौप्य पदक मिळवणाऱ्या कोरियाच्या संग युन्होपेक्षा सौरभने 7.5 गुण अधिक मिळवले आहे. तर स्वित्झर्लंडच्या जेसन सोलॅरीनला 215.6 गुणांनी कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेसाठी भारताचे चार नेमबाज पात्र ठरले होते. त्या चारही जणांनी पदकांची कमाई केली आहे. यामध्ये शाहू तुषार माने आणि मेहूली घोष यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 10 मीटर एयर रायफलमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. तसेच मनू भाकेरने महिलांच्या 10 मीटर पिस्टलमध्ये सुवर्ण पटक जिंकले आहे.
https://twitter.com/olympicchannel/status/1050212337737715713
महत्त्वाच्या बातम्या:
–वन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा
–वाढदिवस विशेष: अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल या ५ खास गोष्टी माहित आहेत का?
–पृथ्वी शाॅच्या अडचणी वाढल्या, विंडीजच्या गोलंदाजाने शोधली बाद करण्याची सुपर आयडीया