---Advertisement---

क्वालिफायर 1 मध्ये नंदुरबार संघाची सांगली संघावर मात

---Advertisement---

पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजपासून प्ले-ऑफस च्या सामान्यांना सुरुवात झाली. प्रमोशन फेरीतील तिसऱ्या क्रमांकावर असलेला नंदुरबार संघ विरुद्ध पाचव्या क्रमांकावर असलेला सांगली संघ यांच्यात क्वालिफायर 1चा सामना झाला. सांगलीच्या अभिषेक गुंगे ने पहिल्या चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. तर नंदुरबारच्या जयेश महाजन ने पहिल्या चढाईत गुण मिळवले. अभिषेक गुंगे व शुभम पाटील ने गुण मिळवत संघाला 5-1 अशी आघाडी मिळवून दिली.

नंदुरबार संघाने अभिराज पवारचा सुपर टॅकल करत 2 गुण मिळवले त्यानंतर जयेश महाजन ने चढाईत 2 गुण मिळवत सामना 5-5 असा बरोबरीत आणला. वरून खंडले व सुशांत शिंदे ने चढाईत गुण मिळवत संघाची आघाडी वाढवली. मध्यंतरा पूर्वी 7 मिनिटं शिल्लक असताना नंदुरबार संघाने सांगली संघाला ऑल आऊट ०करत 13-09 गुण मिळवले. त्यानंतर सामना चुरशीचा झाला. मध्यांतराला 21-16 अशी सांगली संघाकडे आघाडी होती. मध्यंतरा सामना चुरशीचा झालेला बघायला मिळाला. नंदुरबारच्या जयेश महाजन व वरून खंडले महत्वपूर्ण गुण मिळवत आघाडी वाढवली. मात्र सांगलीच्या अभिराज पवार व अभिषेक गुंगे चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 31-35 अशी पिछाडी कमी केली.

नंदुरबार संघाने 4 गुणांची आघाडी कायम ठेवत शेवटचे 5 मिनिटं वेळ काढत सामना अखेर 41-36 असा जिंकला. नंदुरबार संघाच्या वरून खंडले ने अष्टपैलू खेळ करत 13 गुण मिळवत विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली. जयेश महाजन सुद्धा अष्टपैलू प्रदर्शन करत 10 गुण मिळवले. सांगलीच्या अभिषेक गुंगे व अभिराज पवार ने सुपर टेन पूर्ण करत चांगली लढत दिली मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. नंदुरबार संघ उद्या क्वालिफायर 3 मध्ये अहमदनगर विरुद्ध खेळेल.

बेस्ट रेडर- अभिराज पवार, सांगली
बेस्ट डिफेंडर- वरून खंडले, नंदुरबार
कबड्डी का कमाल – संचित शिंदे, नंदुरबार

महत्त्वाच्या बातम्या-

युवा कबड्डी सिरीजच्या रेलीगेशन फेरीत नाशिक संघ पहिल्या क्रमांकावर

युवा कबड्डी सिरीजमध्ये रेलीगेशन फेरीत नाशिक संघाचा विजयाचा षटकार

रेलीगेशन फेरीत सहावा सामना जिंकत रायगड संघाची गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---