ऍशेस 2023चा शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हलवर सुरू आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रॉड आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ओव्हलवर खेळत असताना भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने त्याला शुभेच्छा दिल्या. युवराजने खास ट्विट करत कौतुक केले.
युवराजने ब्रॉड निवृत्त झाल्यानंतर खास ट्विट करत लिहिले,
‘ब्रॉडला सलाम, एका शानदार आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीसाठी अभिनंदन. खेळाच्या इतिहासातील एक सर्वोत्तम आणि जबरदस्त कसोटी गोलंदाज, एक दिग्गज. तुझा प्रवास आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.’
Take a bow @StuartBroad8 🙇🏻♂️
Congratulations on an incredible Test career 🏏👏 one of the finest and most feared red ball bowlers, and a real legend!
Your journey and determination have been super inspiring. Good luck for the next leg Broady! 🙌🏻 pic.twitter.com/d5GRlAVFa3
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 30, 2023
युवराज सिंग याने 2007 साली आयसीसी टी20 विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉड याची चांगलीच धुलाई केली होती. युवराजने ब्रॉडच्या षटकातील सहाही चेंडूंवर षटकार मारले होते. असे असले तरी, वयाच्या 21व्या वर्षी युवराजकडून धुलाई झाल्यानंतर ब्रॉडने आपल्या कारकिर्दीत पुढे 17 वर्ष इंग्लंड संघाला सेवा पुरवली. ब्रॉड आज जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 600 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रॉडने निवृत्तीनंतर बोलताना युवराजची आठवण काढली होती. तो म्हणाला, ““तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मी शक्यतो 21-22 वर्षांचा होतो. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो होतो. त्या अनुभवानंतर (युवराजने मारलेले सहा षटकार) माझ्या लढवय्या स्वभावाला सुरुवात झाली. त्या सामन्यामुळे आम्ही विश्वचषकातून बाहेर झालो नाही, पण त्या दिवसामुळे आजचा मी घडलो.”
ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने 845 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आतावर्यंत 602 विकेट्स असून ओव्हल कसोटीच्या शेवटच्या डावात हा आकडा अजून वाढू शकतो
(Yuvaraj Singh Congratulate Stuart Broad On His Retirement)
महत्वाच्या बातम्या –
एअर होस्टेसनं पार केली हद्द! धोनी झोपेत असताना काढला व्हिडिओ, चाहत्यांचा आक्षेप
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व