---Advertisement---

गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश

Stuart-Broad-And-James-Anderson
---Advertisement---

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या ऍशेस 2023 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यानच इंग्लंडला मोठा धक्का बसला. शनिवारी (दि. 29 जुलै) इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, ब्रॉडने जेम्स अँडरसन याच्या कारकीर्दीत निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अँडरसनच्या नावावर भलताच विक्रम नोंदवला गेला आहे. खास बाब अशी की, रविवारी (दि. 30 जुलै) अँडरसन त्याचा 41वा वाढदिवस साजरा करतोय.

अँडरसनचा विक्रम
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Stuart Broad Retirement) घेताच जेम्स अँडरसन (James Anderson) याने विचित्र विक्रम केला. अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा स्टुअर्ट ब्रॉड हा आठवा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, यादीतील सर्व खेळाडू हे कसोटीत सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू आहेत.

https://twitter.com/ICC/status/1685430743764262912

अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारे खेळाडू
अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक कॅलिस, शिवनारायण चंद्रपॉल, राहुल द्रविड, ऍलिस्टर कूक यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू असन यादीत अँडरसन 183 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, तो अजून निवृत्त झाला नाहीये. इतर खेळाडूंच्या कसोटी सामन्यांविषयी बोलायचं झालं, तर सचिनने सर्वाधिक 200 खेळले आहेत.

त्याच्यापाठोपाठ रिकी पाँटिंग 168, स्टीव्ह वॉ 168, स्टुअर्ट ब्रॉड 167, जॅक कॅलिस 166, शिवनारायण चंद्रपॉल 164, राहुल द्रविड 164 आणि ऍलिस्टर कूक 161 सामने खेळले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे अव्वल 10 खेळाडू
200 – सचिन तेंडुलकर
183 – जेम्स अँडरसन*
168 – रिकी पाँटिंग
168 – स्टीव्ह वॉ
167 – स्टुअर्ट ब्रॉड
166 – जॅक कॅलिस
164 – शिवनारायण चंद्रपॉल
164 – राहुल द्रविड
161 – ऍलिस्टर कूक

अँडरसनची कारकीर्द
जेम्स अँडरसन याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 15 डिसेंबर 2002 रोजी इंग्लंडकडून वनडे पदार्पण, तर 22 मे 2003 रोजी कसोटी पदार्पण केले होते. तसेच, 9 जानेवारी, 2007मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते.

अँडरसनने इंग्लंडकडून 183 कसोटी सामने खेळताना 9.24च्या सरासरीने 690 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने 194 सामने खेळताना 29.22च्या सरासरीने 269 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 19 सामने खेळताना 30.66च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडची कारकीर्द
स्टुअर्ट ब्रॉड हा अँडरसननंतर कसोटीत सर्वाधिक विकेट्स (602) घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून 167 कसोटी सामने खेळताना 27.66च्या सरासरीने 602 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने 121 सामने खेळताना 30.13च्या सरासरीने 178 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 22.93च्या सरासरीने 65 विकेट्स घेतल्या आहेत. ( Stuart Broad Announces Retirement From International Cricket retire during james Anderson career see list of other players)

महत्त्वाच्या बातम्या-
आता विश्वचषक विसरा! 247 दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात फेल ठरला संजू, नेटकरीही संतापले
फक्त ‘या’ कारणामुळे दुसऱ्या वनडेत खेळले नाहीत रोहित-विराट, हार्दिक पंड्याने स्वत: केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---