---Advertisement---

भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार जेम्स अँडरसन, स्वतः सांगितला फ्युचर प्लॅन

James Anderson
---Advertisement---

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीबाबत मागच्या काही दिवसांपासून चर्चा चांगल्याच वाढल्या आहेत. रविवारी (30 जुलै) अँडरसन 41 वर्षांचा होणार आहे आणि अशाच त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा स्वाभाविक आहेत. मात्र, इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज अद्यापही निवृत्तीचा विचार करत नाहीये. सध्या अंडरसन ऍशेस 2023च्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि निवृत्तीबाबत त्याने महत्वाची प्रतिक्रिया दिली.

ऍशेस 2023 (Ashes 2023) पूर्वी जेम्स अँडरसन (James Anderson) दुखापतीतून सावरला असून त्याची गती आणि स्विंग कमी झाल्याचे बोलले जात आहे. पुनरागमनानंतर अँडरसनला अद्याप लय मिळाली नाही, असेच दिसते. ऍशेस 2023मध्ये त्याला आतापर्यंत अवघ्या पाच विकेट्स मिळाल्या आहेत. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात तो खेळला नाही, पण राहिलेल्या चारही सामन्यांमध्ये कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. या मालिकेत अँडरसनचे प्रदर्शन सुमार दिसले असले, तरी त्याला स्वतःला असे वाटत नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अँडरसन म्हणाला, “मी खराब गोलंदाजी केली, असे मला वाटत नाही. माझ्या मते अजूनही मी संघाला खूपकाही देऊ शकतो.”

“जोपर्यंत निवृत्तीचा प्रश्न आहे, तर मी इतक्यात निवृत्त होणार नाहीये. अजून मी संघाला खूपकाही देऊ शकतो. तुम्हाला आशा असते की, महत्वाच्या मालिकांमध्ये खराब फॉर्न नसावा, पण माझ्यासोबत असे होत आहे. पण तरीही संघासाठी काहीतरी खास करण्याची संधी माझ्याकडे आहे.” ऍशेस मालिका संपल्यानंतर इंग्लंड संघ आपला पुढचा कसोटी सामना थेट जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळेल. अँडरसन या मालिकेत खेळण्यासाठी तयार दिसत आहे. तो पुढे म्हणाला, “एका गोलंदाजाच्या रुपात तुम्ही वयाची तीस वर्ष पूर्ण केल्यानंतर लोक विचारू लागतात, किती वेळ बाकी आहे. पण मागच्या तीन चार वर्षांमध्ये मी चांगली गोलंदाजी केली आहे. मी फिट आहे आणि चांगला खेळत आहे.”

दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील पाचव्या कसोटीचा विचार केला, तर दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ 12 धावांनी पुढे होता. पहिल्या डावात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 283 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 295 धावा कुटल्या. (James Anderson gave important information about his retirement)

महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या कसोटी खेळण्यावरून दोन भारतीय दिग्गज भिडले, वाचा काय घडले
WIvsIND । विराटकडून धोनीच्या विक्रमाला तडा जाणार? यादीत रोहित सर्वोच्च स्थानी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---