भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने एक ट्विट करत दावा केला की यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब संघ दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२० चा अंतिम सामना खेळतील. पण यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही त्याला मजेशीर उत्तरे दिली आहेत.
झाले असे की आयपीएलच्या १३ व्या हंगामात रविवारचा (१८ ऑक्टोबर) दिवस सुपर ओव्हरने गाजवला. रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यांत मिळून ३ सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेल्या दुसऱ्या सामन्यात चक्क २ सुपर ओव्हर झाल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने विजय मिळवला. या सामन्यांबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
याचवेळी पंजाब विरुद्ध मुंबई हा सामना सुरु असताना युवराजने ट्विट केले होते की ‘आज रात्री निकोलस पूरन गेम चेंजर होईल असे मला वाटत आहे. तो चांगल्या लईत असल्याचे वाटत आहे. पाहाताना मजा येत आहे मला. मला कोणाचीतरी तो आठवण करुन देत आहे. माझी भविष्यवाणी अशी आहे की पंजाब प्लेऑफ खेळेल आणि मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अंतिम सामना खेळले.’
Looks like tonight’s game changer is going to be @nicholas_47 ! Beautiful flow of the bat ! So amazing to watch ! Reminds me of someone I live within 😀 ! Game on ! My prediction I feel @kxip will go all way to playoffs and play the finals along with @mipaltan or @DelhiCapitals
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 18, 2020
यावर चहलने त्याला उत्तर दिले की ‘भैय्या आम्ही भारतात येऊ का मग परत?’ त्यावर युवराजने त्याला प्रतिउत्तर दिले की ‘अजून थोडे षटकार खा आणि विकेट्स घेऊन ये!’ यानंतर चहलही शांत बसला नाही. त्याने त्यावरही युवराजला उत्तर दिले, ‘ओके, भैय्या १० नोव्हेंबरपर्यंत थोडे विकेट्स आणि थोडे षटकार खातो.’ हा मजेशीर संवाद युवराजने पुढे चालू ठेवला. युवराजने चहलला प्रतिउत्तर दिले की ‘बिलकूल! अंतिम सामना नक्की पाहून ये.’
Bhaiya Hum india aajaye wapis ? 😋😋🙈🙈🤣🤣
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) October 18, 2020
Abhi thodey aur chakey kha ke aur wickets let ke aana🤪😜
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 18, 2020
Ok bhaiya 10th November Tak wickets or kha leta Hun sixes 👻😋💪
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) October 18, 2020
Bilkul ! Final zaroor dekh kar aana 😂
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 18, 2020
खरंतर १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे आणि सध्या प्लेऑफच्या शर्यतीत मुंबई, दिल्लीबरोबरच बेंगलोर संघही आघाडीवर आहे. त्यामुळे चहल युवराजला सुचवत होता की बेंगलोर संघही अंतिम सामना खेळू शकतो. सध्या आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर पंजाब संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ‘तो’ एका षटकार खेचत गेलने दाखवून दिले का आहे तो युनिवर्सल बॉल
रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले
सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस