भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९ सप्टेंबरचा दिवस महत्वाचा आहे. याच दिवशी भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंगने एक विश्वविक्रम त्याच्या नावावर केला होता. युवराजने याच दिवशी २००७ मध्ये टी २० विश्वचषकात इंग्लंविरुद्ध एका षटकामध्ये सहा षटकार मारले आहेत. युवराजने त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडला हे सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्याने या सामन्यात केवळ १२ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करून विश्वविक्रमाची नोंद केली होती. हा विक्रम आजपर्यंत कोणी मोडू शकले नाही.
युवराजच्या या विक्रमाला रविवारी १४ वर्षे पूर्ण झाले. या खास दिवशी युवराजने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने १४ वर्षानंतर त्या संपूर्ण प्रसंगाची आठवण करून देणारा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
युवराजने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “सहा षटकारांची कहानी, युवीच्या तोंडी. मित्रांनो तुम्ही माझ्या अभिनयाविषयी काय विचार करता. स्टुअर्ट ब्राॅड मी फक्त चेष्टा करत आहे. फ्लिटाॅफ या व्हिडिओविषयी तुमचे काय मत आहे.”
व्हिडिओमध्ये युवराजने त्या प्रसंगाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि बॅकग्राउंडमध्ये प्रेक्षकांचा ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. सुरुवातीला व्हिडिओत युवाराज एका लाकडाच्या टेबलवर बसतो आणि म्हणतो, माझी फलंदाजी कधी येणार? फलंदाजीसाठी आल्यावर युवराज महेंद्रसिंग धोनीला विचारतो की, खेळपट्टीवर बाउंस कसा आहे, असेही व्हिडिओत दाखवले आहे. यानंतर युवराज आणि फ्लिंटॉफमध्ये झालेला वादही युवराजने जसाच्या तसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे म्हटले जाऊ शकते की, युवराजने या व्हिडिओच्या माध्यामातून १४ वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तरा चाहत्यांपूढे मांडला आहे.
6 छक्कों की कहानी, Yuvi ki ज़ुबानी 🤪😂
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣What do you think of my acting guys 🤪🤩 Bollywood next??@StuartBroad8 just having some fun!@flintoff11 how about a fun reaction video? https://t.co/4XBlIJaQ7J
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 19, 2021
दरम्यान, युवराजने ज्या प्रसंगाची आठवण सर्वांसोबत शेअर केली आहे, तो सामना टी २० विश्वचषकात २००७ मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडला २१८ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजीवेळी १९ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठई स्टुअर्ट ब्राॅड आला होता. त्यापूर्वी युवराज आणि अँड्र्यू फ्लिंटॉफमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता.
यानंतर युवराजने ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारले आणि संघाची धावसंख्या २०० पार घेऊन गेला. इंग्लंड संघ २१९ धावांचे मोठे लक्ष्य गाठू शकला नाही आणि भारताने हा सामना जिंकला होता. युवराजला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रायुडू-चहरच्या दुखापतींविषयी प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा महत्त्वपूर्ण खुलासा, म्हणाले…
चिअरलीडर्सचा डान्स अन् स्टेडिअममध्ये महिलांची उपस्थिती; अफगाणिस्तानात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी
चर्चा आयपीएलच्या प्लेऑफची! ‘हे’ संघ गुणतालिकेत राहतील पहिल्या चार स्थानांवर, गंभीरचा अंदाज