1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी पंजाब संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधाराची सुत्रे मनदीप सिंगकडे सोपवण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
काही दिवसांआधीच युवराजने युवा खेळांडूना संधी द्यावी असे म्हटले होते. कदाचित या कारणामुळेच त्याला संघात घेतले नसावे. तसेच आताच्या संघात युवा खेळांडूचाच बोलबाला आहे.
तसेच हरभजन संघासाठी विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला नसल्याने त्याला संघात घेतले नाही. मनदीपच्या नेतृत्वाखाली पंजाबने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांचा संघ बाद फेरीपर्यंतही पोहचला होता. पण त्यांना या स्पर्धेत खराब हवामानाचा फटका बसला होता.
रणजी ट्रॉफीसाठी पंजाबचा संघ- मनदीप सिंग (कर्णधार), अभिषेक शर्मा, अर्पित पन्नू, विनय चौधरी, जीवनजोत सिंग, शरद लुंबा, सनवीर सिंग, शुभमन गील, अभिषेक गुप्ता, अनमोलप्रीत सिंग, बलतेज सिंग, गुरकीरत सिंग मान, सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंडे, शुबेक गील, बरिंदर स्रान
महत्त्वाच्या बातम्या:
–७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला
–Video: शतक साजरे करणाऱ्या रहाणेला या कारणामुळे सुरेश रैनाने थांबवले