---Advertisement---

कुणी तरी येणार येणार गं! युवराज सिंग लवकरच होणार बाबा? चर्चेला आले उधाण

On: सोमवार, मार्च 1, 2021 9:35 AM
---Advertisement---

माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. जरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी सतत क्रिकेटच्या चालू घडामोडींवर भाष्य करत असतो. नुकतीच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी त्याच्या चर्चेचे कारण ठरली आहे त्याची पत्नी हेजल कीच.

हेजल सध्या गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. रविवारी (२८ फेब्रुवारी) हेजलचा ३४ वा वाढदिवस होता. यानिमित्ताने युवराजने आपल्या काही मित्रांसह तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळचा एक व्हिडिओ आणि काही फोटो युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

त्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये हेजल गर्भवती असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी युवराजच्या पोस्टवर तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हेजलला वाढदिवसा बरोबर लवकरच आई बनण्यासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी युवी सर ज्युनियर युवराजचे कधी आगमन होईल, असे विचारले आहे. असे असले तरीही, युवराज आणि हेजल यांनी अधिकृतपणे या गोष्टीची घोषणा केलेली नाही.

सिक्सर किंग युवराज आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेजल यांचा १२ नोव्हेंबर २०१५ रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर हेजलने आपले नाव बदलून गुरबसंत कौर असे ठेवले आहे. संत बलविंदर सिंग यांनी लग्नावेळी तिला हे नाव दिले होते. बॉलिवूडमध्ये सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हेजल कीचने, २०११ मध्ये बॉडीगार्ड चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

https://www.instagram.com/p/CL1i_DFD-nC/?utm_source=ig_web_button_share_sheet

युवराज सिंगविषयी बोलायचे झाले तर, २००० ते २०१७ या कालावधीत त्याने भारती संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. यादरम्यान त्याने ३०४ वनडे सामन्यात ८७०१ धावा आणि १११ विकेट्स घेतल्या होत्या. तर ५८ टी२० सामन्यात ११७७ धावा आणि २८ विकेट्सची कामगिरी केली होती. कसोटीमध्येही ४० सामने खेळताना त्याने १९०० धावा आणि ९ विकेट्सची नोंद केली होती. २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रहाणेसाठी धावून आले भारतीय दिग्गज; म्हणाले, “त्याच्या योगदानाला दुर्लक्षित…”

सुपरमॅन! हवेत सूर मारत पंड्याने एकहाती पकडला भन्नाट झेल, व्हिडिओ पाहून करालं वाहवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---