भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) युवारजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट शेअर केली. पोस्टमधून हे समजते की, युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहेत.
युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी आपल्या दुसऱ्या बाळाचे नाव “ओरा” असे ठेवले आहे, जी एक मुलगी आहे. युवराजने शेअर केलेल्या फोटोमध्ये युवारज आणि हेजल आपल्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहेत. दोघेही प्लास्टिक बॉटलमधून दूध पीत आहेत. हेजलने मुलाल घेतले आहे, तर नवजात मुलगी युवराजच्या हातांमध्ये आहे. सिंग फॅमेलीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. “जागून काढलेल्या रात्री आता आनंदी बनल्या आहेत. कारण आम्ही आता आमची छोटी राजकुमारी ‘ओरा’ हिचे स्वागत करून आणि कुटुंब पूर्ण करत आहोत.”
https://www.instagram.com/p/CwXgusaIgEl/?igshid=MzRlODBiNWFlZA==
युवराजने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. दरम्यान, युवारनशी लग्न करण्याआधी बॉलिवूड अभिनेत्री मॉडेल हेजल कीच क्रिकेटपटूसोबत दीर्घ काळ रिलेशनमध्ये होती. 30 नोव्हेंबर 2016 रोजी दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर 25 जानेवारी 2022 रोजी युवारज आणि हेजल पहिल्यांदा आई-वडील बनले. त्यांच्या पहिल्यी मुलाचे नाव ओरियन असे आहे.
युवारजच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर2019 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने एकून 11778 धावा केल्या आहेत. यात 17 शतक आणि 711 अर्धशतके केली आहेत. गोलंदाजाच्या रुपात त्याने 148 विकेट्स घेतल्या आहेत. (Yuvraj Singh and Hazel Keech became parents for the second time)
महत्वाच्या बातम्या –
अलूरमध्ये सुरू झाला टीम इंडियाचा ट्रेनिंग कॅम्प! वाचा पहिल्या दिवशी काय घडले?
AFGvsPAK । सामना जिंकल्यानंतर संतापला बाबर आझम, अफगाणी खेळाडूंशी कर्णधाराने का घातला वाद?